ब्रेकिंग न्यूज

नवनियुक्त पोलीस पाटलांचे प्रशिक्षण सत्र व कार्यशाळा संपन्न.

कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी बीड पोलिसांचा पुढाकार.

बीड(प्रतिनिधी)बीड पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यातील नव्याने नियुक्त पोलीस पाटील यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण सत्र उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडले. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून पोलीस पाटील यांच्या पदाची भूमिका, जबाबदाऱ्या, कर्तव्ये आणि कायदेशीर अधिकार याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

प्रशिक्षण सत्रात ग्रामपातळीवर कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे, संशयास्पद हालचालींची माहिती पोलीस प्रशासनाला तातडीने देणे, तसेच शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत सहकार्य करणे या विषयांवर विशेष भर देण्यात आला. सामाजिक सलोखा, शांतता आणि गावातील सुरक्षित वातावरण टिकवून ठेवण्यासाठी पोलीस पाटील यांनी सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहनही करण्यात आले.

ग्रामपातळीवरील कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी बीड पोलिसांचा पुढाकार घेतला.

यावेळी आपत्ती व्यवस्थापन, निवडणूक कामकाजातील जबाबदाऱ्या, महिला व बालकांच्या सुरक्षेसंदर्भातील कर्तव्ये तसेच ग्रामस्थांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी प्रभावी संवाद कसा साधावा याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

प्रसंगी बोलताना नवनीत कांवत यांनी पोलीस पाटील हे गावपातळीवरील पोलीस यंत्रणेचे महत्त्वाचे दुवा असल्याचे सांगत प्रामाणिकपणे व जबाबदारीने काम करण्याचे आवाहन केले. बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पोलीस प्रशासन आणि ग्रामपातळीवरील यंत्रणेमधील समन्वय अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

या उपक्रमामुळे बीड पोलिसांनी लोकाभिमुख आणि प्रभावी प्रशासनाची सकारात्मक सुरुवात केली असून, जिल्ह्यातील सुरक्षितता आणि सर्वांगीण विकासासाठी सर्व पोलीस पाटील एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button