ब्रेकिंग न्यूज

रस्त्यालगत झोपलेल्या शेतकऱ्याला लुटणारे तिघे जेरबंद.

₹1.09 लाखांचा मुद्देमाल हस्तगत,तिघे ताब्यात,पेठ बीड पोलिसांची कारवाई.

बीड(प्रतिनिधी)बीड मध्ये सध्या लुटारु रस्त्यावरून जाणाऱ्या नशेत असणाऱ्या नागरिकांवर पाळत ठेवत लुटत असल्याच्या घटनात वाढ झाल्याचे दिसत आहे.मागील आठवड्यात बीड परळी रस्त्यावरील पंगारबावडी येते एका तरुणाला रात्री दहा वाजता मोबाईल व दुचाकी तिघांनी लंपास केली होती.

पेठ बीड पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात जलद कारवाई करत दारूच्या नशेत रस्त्याच्या कडेला झोपलेल्या शेतकऱ्याचे दागिने व मोबाईल चोरणाऱ्या तिघा आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून ₹1.09 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा क्रमांक 206/2026, कलम 303(2) बीएनएस अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. 19 जून 2026 रोजी सायंकाळी 7 ते 8 वाजण्याच्या दरम्यान, रमाई चौक, पेठ बीड येथून पुढे सुमारे 100 मीटर अंतरावर ही घटना घडली.

फिर्यादी दादासाहेब लक्ष्मण घोरड (वय 32, रा. ब्रह्मगाव, ता. जि. बीड) हे दारूच्या नशेत रस्त्याच्या कडेला दुचाकी थांबवून झोपले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या अंगावरील दोन सोन्याच्या अंगठ्या व ओप्पो कंपनीचा मोबाईल असा एकूण ₹1.57 लाखांचा मुद्देमाल चोरून नेला.

तपासादरम्यान पोलिसांनी पांडुरंग बंडू रोकडे (वय 21, रा. रमाईनगर, खंडेश्वरी रोड), शुभम उर्फ चिक्या शाम खुपसे (वय 21, रा. चांदण्याचा वाडा, काळा हनुमान ठाणा) आणि उमेश सुरेश चांदणे (वय 25, रा. चांदण्याचा वाडा, काळा हनुमान ठाणा, पेठ बीड) यांना अटक केली.

आरोपींकडून 6.810 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी (किंमत ₹84 हजार) आणि ओप्पो कंपनीचा मोबाईल (किंमत अंदाजे ₹25 हजार) असा एकूण ₹1.09 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख, DYSP वेंकटराम,पो.निरीक्षक निलेश केळे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकातील पीएसआय शहा,api उबाळे,psi बारगळ,पोलीस हवालदार नितीन राठोड, मोठे, पोलीस अंमलदार विष्णू गुजर, औदुंबर गिरी आणि पांडुरंग परजने यांनी ही यशस्वी कारवाई केली.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button