“महादेव”ॲपवर पोलिसांचा छापा.
8 अटकेत,34 मोबाईलसह ₹8.14 लाखांचा मुद्देमाल जप्त;DYSP वेंकटराम यांची कारवाई.

बीड(प्रतिनिधी)केज उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या विशेष पथकाने बेकायदेशीरपणे LOTAS 365 (महादेव ॲप) या ऑनलाइन जुगार अॅपद्वारे जुगार खेळविणाऱ्या रॅकेटवर मोठी कारवाई करत आठ जणांना ताब्यात घेतले असून ₹8.14 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 जून 2026 रोजी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास सहायक पोलीस अधीक्षक वेंकटराम (भा.पो.से.) यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे विशेष पथकाने ही कारवाई केली. आरोपी लोकांना अधिक पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून LOTAS 365 (महादेव ॲप) वर विनापरवाना ऑनलाइन जुगार खेळत व खेळवत असल्याचे तपासात समोर आले.
या प्रकरणी अनंत नवनाथ खंदारे, अक्षय अनिल गायकवाड, अनिल कबीर सानप, आसाराम बळीराम केकाण, गणेश लक्ष्मण खंदारे, हर्षल मनोहर खंडारे, सुशील दत्तात्रय मुंडे आणि विशाल उत्तम बारवाळ या आठ जणांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 397/2026, महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम 12(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान 34 मोबाईल फोन, 4 मोटारसायकली आणि इतर साहित्य असा एकूण ₹8,14,500 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कामगिरी नवनीत कावत (भा.पो.से), पोलीस अधीक्षक बीड, चेतना तिडके मॅडम, अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई, वेंकटराम (भा.पो.से), सहायक पोलीस अधीक्षक, केज जि. बीड, यांचे मार्गदर्शना खाली ग्रे.पो.उप.नि अमीरोद्दीन इनामदार, पो. हवा/1687 धोंडीराम योगीराज मोरे, पो.हवा/1051 राजु वंजारे, पो.हवा/1885 विशाल क्षिरसागर, पो.हवा/1035 अनिल मंदे, पो. हवा / मिसबा इनामदार, पो. हवा/मल्लीकार्जुन माने, पो.अं./2301 जरगर, पो. अं/ मयुर टकले नेमणुक विशेष पथक, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, केज जि. बीड यांनी केलेली आहे.
बीड जिल्ह्यात ‘महादेव ॲप’चे वाढते जाळे; बँक खात्यांचीही चौकशी होणार का?
बीड शहर व जिल्ह्यात ऑनलाइन जुगाराचे जाळे दिवसेंदिवस वाढत असल्याची चर्चा आहे. विशेषतः बेरोजगार तरुणांच्या नावावर बँक खाती उघडून त्यांचे पासबुक, एटीएम कार्ड व इतर कागदपत्रे ताब्यात घेऊन त्या खात्यांद्वारे लाखो रुपयांचे व्यवहार होत असल्याच्या तक्रारी वेळोवेळी समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अशा संशयित बँक खात्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. मात्र, या संदर्भातील दावे तपासाअंतीच निश्चित होतील.







