ब्रेकिंग न्यूज

पुतण्याने गळफास घेतल्याचे समजताच चुलत्याचाही अटॅकने मृत्यू.

तासाभरात दोन मृत्यूंनी बार्शी नाका परिसर हळहळ;कदम कुटुंबावर दुहेरी दुःखाचा डोंगर.

बीड (प्रतिनिधी) बीड शहरातील शिवाजी नगर परिसरात बुधवारी रात्री अत्यंत हृदयद्रावक घटना घडली.मूळ बार्शी नाका ह.म.शिवाजीनगर येथे राहणाऱ्या सोनू कदम यांनी राहत्या घरी गळफास घेतला त्याला दवाखान्यात दाखल केले परंतु डॉक्टररांनी तपासणी करुन मृत घोषित केले.

सोनुने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच त्यांचे चुलते तथा बांधकाम व्यावसायिक अशोक कदम हें घरी गेले असता कदम कुटूंबातील सद्स्यांना दुःखातून सावरत असतानाच त्यांनाच अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि उपचारापूर्वीच त्यांचेही निधन झाले.

अवघ्या एका तासाच्या अंतराने कुटुंबातील दोन सदस्यांचा मृत्यू झाल्याने कदम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुहेरी आघातामुळे बार्शी नाका व शिवाजीनगर परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

अशोक कदम हे बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील परिचित व्यक्तिमत्त्व होते. शांत, संयमी आणि प्रेमळ स्वभावामुळे त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. त्यांच्या निधनाने नातेवाईक, मित्रमंडळीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

अशोक कदम आणि सोनू कदम यांच्यावर गुरुवारी (दि. २५ जून) दुपारी भगवान बाबा मंदिर जवळील स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button