ब्रेकिंग न्यूज

पोलीस निरीक्षक निलेश केळे ॲक्शन मोडवर.

डॉ.आंबेडकर पुतळा परिसरातील अतिक्रमण धारकांना अंतिम इशारा;अतिक्रमण कराल तर कारवाई निश्चित.

बीड( प्रतिनिधी)बीड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील वाढत्या अतिक्रमणांवर आणि वाहतुकीच्या अडथळ्यांवर नियंत्रण आणण्यासाठी पेठ बीड पोलीस निरीक्षक निलेश केळे यांनी शुक्रवारी ॲक्शन मोडमध्ये येत संबंधित व्यावसायिक, हातगाडीधारक आणि सिटी रिक्षाचालकांना समज दिली. उद्यापासून अतिक्रमण कायम आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

यावेळी पोलिसांनी सिटी रिक्षाचालकांना रिक्षा शिस्तबद्ध पद्धतीने उभ्या करण्याच्या सूचना दिल्या. तसेच रस्त्यावर भाजीपाला, फळे व इतर वस्तूंच्या हातगाड्या लावून वाहतुकीस अडथळा निर्माण करू नये, असेही सांगण्यात आले. विनापरवाना लावण्यात आलेले होर्डिंग्ज तातडीने काढून टाकण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण असून रस्त्यावर फळगाडे,भाजीपाला, बॅनर तसेच इतर दुकाने थाटल्याने वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता, यामुळे पेट बीड पोलीस यांनी या भागातील अतिक्रमण धारकांना समोर देत अतिक्रमण केल्यास कारवाईचा इशारा दिला.

या कारवाईदरम्यान नगरपालिकेचे कर्मचारीही उपस्थित होते. पोलीस निरीक्षक निलेश केळे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक पुजारी, पोलीस कर्मचारी पो.हे.मोठे,पो.हे.नितीन राठोड,पो. अल्ताफ शेख,पो.हे.राख तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी परिसरातील व्यापाऱ्यांशी संवाद साधून नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.

यावेळी उपस्थित व्यापारी, हातगाडीधारक व इतर व्यावसायिकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करण्याचे आश्वासन दिले. मात्र, उद्यापासून नियमांचे उल्लंघन करून अतिक्रमण अथवा वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता कारवाई केली जाईल, असा इशारा पेठ बीड पोलिसांनी दिला आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button