ब्रेकिंग न्यूज

पेठ बीड पोलिसांची गुटख्यावर धडक कारवाई.

दोन छाप्यांत 53 हजारांचा प्रतिबंधित साठा जप्त;API पुजारी, PSI बारगळ यांची कारवाई.

बीड, दि. 27 : राज्य सरकारने गुटखा व तंबाखूजन्य पदार्थावर बंदी घातली असताना बीड शहरात, जिल्ह्यात मात्र गुटखा राजरोस विक्री होत असून यावर अन्न सुरक्षा अधिकारी यांचे दुर्लक्ष असल्याचे देखील दिसत आहे. अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यापासून राज्यांमध्ये कारवायाचा धडाका सुरू असताना बीडमध्ये मात्र कारवाया करण्यास अन्न सुरक्षा अधिकारी उदासीन असल्याचे दिसत आहेत.

पेठ बीड पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकासह संयुक्त कारवाई करत प्रतिबंधित गुटख्याच्या साठ्यावर धडक कारवाई केली. दोन वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यांत एकूण सुमारे 53 हजार 808 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला असून, तीन जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी एक आरोपी फरार आहे.

 पेठ बीड सहाय्यक पोलीस निरीक्षक पुजारी यांना गुप्त मिळालेल्या माहितीवरून बीड परळी रोडवरील अबरार कॉलनी परिसरातील एका घरावर छापा टाकण्यात आला. येथे शेख सलीम मोहम्मद (वय 35) याच्याकडून 47 हजार 710 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणात शेख मेहराज मोहम्मद (वय 37) याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार आहे. हा गुन्हा पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 212/2026 अंतर्गत दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या कारवाईत भिमनगर,जुना मोंढा येथील पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकून सिद्धांत सती हिरवे (वय 33) याच्याकडून 6 हजार 98 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणी गुन्हा क्रमांक 213/2026 दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही प्रकरणांत अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 मधील विविध कलमांसह भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फिर्याद अजय भगवान गाढे, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन, बीड यांनी दिली आहे.

या प्रकरणांचा पुढील तपास पहिल्या गुन्ह्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पुजारी, तर दुसऱ्या गुन्ह्यात पोलीस उपनिरीक्षक बारगळ करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ बीड पोलीस निरीक्षक निलेश केळे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने केली.

गुटख्यावर धडक कारवाई केल्याने गुटखा विक्री व साठा करणारात एकच खळबळ उडाली.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button