ब्रेकिंग न्यूज

पेठ बीड पोलिसांची “सर्च ऑल आऊट”मोहीम यशस्वी.

दोन वर्षांपासून फरार आरोपी जेरबंद, NBW धारकही ताब्यात.

बीड( प्रतिनिधी)पेठ बीड पोलिसांनी राबविलेल्या ‘ऑल आऊट ऑपरेशन’ अंतर्गत दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे फरार गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक निर्माण झाला आहे.

पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत विविध गुन्ह्यांतील अनेक आरोपी न्यायालयीन तारखांना हजर राहत नसून दीर्घकाळापासून फरार होते. या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या आदेशानुसार विशेष सर्च मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेदरम्यान गुन्हा रजिस्टर क्रमांक 365/2024, कलम 109 बी.एन.एस. मधील आरोपी अर्जुन चांगोजी लोंढे (वय 21, रा. जुना मोंढा, पेठ बीड) हा मागील दोन वर्षांपासून फरार होता. पोलिसांनी काटेकोर तपास करून त्याला ताब्यात घेतले.

तसेच, दुसऱ्या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये आरसीसी क्रमांक 160/2024 अंतर्गत प्रलंबित असलेल्या नॉन-बेलेबल वॉरंट (NBW) धारक आरोपीलाही अटक करण्यात आली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पेठ बीड पोलीस ठाण्याचे निरीक्षक मारुती खेडकर यांच्या नेतृत्वाखाली पो.उप.नि. मन्सूर शहा, पो.ह. नितीश माने, गणेश चौगले तसेच पोलीस अंमलदार विष्णु गुजर, औदुंबर गिरी, कल्याण जाधव आणि अशोक परजणे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

या दुहेरी कारवाईमुळे फरार आरोपींवर नियंत्रण येण्यास मदत होणार असून, गुन्हेगारीवर आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button