ट्रॅक्टर चोरी प्रकरणाचा अवघ्या दोन दिवसात उलगडा.
5 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाला सह एक ताब्यात;स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी.

बीड (प्रतिनिधी) दि.18 एप्रिल 2026 केज तालुक्यातील कानडी माळी येथून चोरीस गेलेल्या ट्रॅक्टर व ट्रॉली प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या दोन दिवसांत छडा लावत आरोपीला अटक केली आहे.
दि.15 एप्रिल 2026 रोजी फिर्यादी सतीश सुदाम बनसोडे (रा. कानडी माळी, ता. केज) यांनी त्यांच्या घरासमोर उभे असलेले ट्रॅक्टर व ट्रॉली चोरीस गेल्याची तक्रार केज पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावरून गुन्हा र.नं. 212/2026 कलम 303(2) बी.एन.एस. अन्वये नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून सुरू होता.
तपासादरम्यान घटनास्थळाच्या परिसरातील 40 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेजची पाहणी व तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. त्यातून आरोपीची ओळख पटली. आरोपी आपल्या घरी आल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर दि.17 एप्रिल रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास पायतळवाडी (ता. माजलगाव) येथे सापळा रचून रामदास आसाराम श्रीराम (वय 25) यास ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरम्यान आरोपीने चोरीची कबुली दिली असून चोरीस गेलेले ट्रॅक्टर शेतात लपवून ठेवल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तेथून ट्रॅक्टर व ट्रॉली असा एकूण सुमारे 5 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीसह जप्त माल पुढील तपासासाठी केज पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके (अंबाजोगाई) व पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड (स्थानिक गुन्हे शाखा, बीड) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, पोलीस हवालदार जफर पठाण, बप्पासाहेब घोडके, दिलीप गिते, विकी सुरवसे, गणेश मराडे आणि विकास राठोड यांचा सहभाग होता.
स्थानिक गुन्हे शाखेच्या टिमणे दोन दिवसात,जलद आणि प्रभावी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.






