ब्रेकिंग न्यूज

बीड महसूल विभागाची मोठी धडक कारवाई.

अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या दोन टिप्पर सह ८० लाखांचा मुद्देमाल जप्त.

बीड(प्रतिनिधी)बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या वाळू घाटांच्या लिलावाच्या पार्श्वभूमीवर चोरट्या पद्धतीने सुरू असलेल्या वाळू उपसा व वाहतुकीवर महसूल विभागाने मोठी कारवाई करत अवैध धंद्यावर जोरदार लगाम लावला आहे. मांजरसुभा–पाटोदा मार्गावरील खंडाळा परिसरात रात्री उशिरा टाकलेल्या सापळ्यात दोन टिप्पर जप्त करण्यात आले असून सुमारे ८० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

विनापरवाना विना रॉयल्टी वाळू वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळताच नायब तहसीलदार प्रशांत जाधवर यांनी तातडीने कारवाई करत संशयास्पद टिप्पर अडवले. तपासणीदरम्यान आवश्यक रॉयल्टी पावत्या नसल्याचे स्पष्ट झाल्याने दोन्ही वाहने ताब्यात घेण्यात आली.

या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या वाहन चालक१) अप्पासाहेब राजेंद्र चव्हाण (रा. आनंदवाडी, ता. गेवराई, जि. बीड)२) राजेंद्र बाबुराव जाधव (रा. जाधव वस्ती, मोरगाव, ता. बीड, जि. बीड)वाहन क्रमांक 1)MH15 GV 7897 तर दुसरा टिप्पर विना नंबर असून वाहन क्रमांक बाबत त्याची चौकशी सूरू आहे.

प्राथमिक चौकशीत ही वाळू गेवराई येथून भरून पाटोदा येथे विक्रीसाठी नेली जात असल्याचे समोर आले आहे. प्रकरणाची नोंद नेकनूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई बीड जिल्हाधिकारी विवेक जॉनसन, तहसीलदार चंद्रकांत शेळके व उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत जाधवर नायब तहसीलदार बीड,सोबत विकास ससाणे ग्राम महसूल अधिकारी पेंडगाव,गणेश गायकवाड ग्राम महसूल अधिकारी कामखेडा अनिल गायकवाड ग्राम महसूल अधिकारी पाली. या कारवाईत महसूल पथकासोबत नेकनूर पोलीस निरीक्षक गोसावी व पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

या धडक कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

 विनापरवाना वाळू,मुरूम विक्रीवर कारवाई सुरूच राहणार : SDM कविता जाधव.

 बीड तालुक्यातील नदीपात्रातून वाळू किंवा डोंगर भागातून विनापरवाना उत्खनन,वाहतूक करणाऱ्यावर कारवाया सुरूच राहणार असून अश्या वाहनावर व मालकावर गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी दिली.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button