बीडमध्ये सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या भीमगीतांचा भव्य कार्यक्रम.
मोठया संख्येने कार्यकमास उपस्थित राहावे :आ.संदीप क्षीरसागर

बीड दि.१७ (प्रतिनिधी) :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्त उद्या दि. १९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या भीमगीतांचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम आ.संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून, या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांच्याकडून करण्यात आले आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या भीमगीतांच्या कार्यक्रमांतून नागरिकांना सामाजिक प्रबोधन आणि सांस्कृतिक आनंदाचा अनुभव घेता येणार आहे.आमदार संदीप क्षीरसागर यांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांची भीमगीते समाजाला प्रेरणा देणारी आणि जागृती निर्माण करणारी आहेत. या कार्यक्रमात सहभागी होऊन आपण सर्वांनी सामाजिक एकता आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा संदेश पुढे न्यावा, असे आ.क्षीरसागर यांनी म्हटले आहे. हा कार्यक्रम बीडमधील सर्व वयोगटातील नागरिकांसाठी खुला असून, मोठ्या उत्साहात त्याचे आयोजन करण्यात येत आहे. उपस्थितांना भीमगीतांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या विचारांचा आणि कार्याचा गौरव अनुभवता येईल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.






