
बीड(प्रतिनिधी)महाराष्ट्र सरकारने गुटखा जन्य तंबाखू वर बंदी घातले असताना देखील बीड जिल्ह्यात मात्र गुटखा राजरोस विक्री केला जात असल्याचे चित्र असून यावर अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे देखील दिसत आहे.बीड
स्थानिक गुन्हे शाखेने अवैध धंद्यांवर कारवाई करत नवगण राजुरी येथे मोठी धडक कारवाई केली. दुकानाच्या गाळ्यात छापा टाकून तब्बल २ लाख ४५ हजार ३२८ रुपयांचा महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला.
आज दि. १६ एप्रिल २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर व त्यांच्या पथकाने नवगण राजुरी परिसरात पेट्रोलिंग सुरू असताना गुप्त माहिती मिळाली. सरकारी दवाखान्यासमोरील एका गाळ्यात प्रतिबंधित गुटखा साठवून विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची माहिती मिळताच वरिष्ठांना कळवून तात्काळ छापा टाकण्यात आला.
या कारवाईत विकास महादेव टुले (वय ३०, रा. नवगण राजुरी, ता. जि. बीड) याच्या ताब्यातून विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला. जप्त मालाची किंमत अंदाजे २,४५,३२८ रुपये असल्याचे सांगण्यात आले. संबंधित आरोपीविरुद्ध बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात पोउपनि श्रीराम खटावकर यांच्यासह राहुल शिंदे, गोविंद राख, सोमनाथ गायकवाड, बाळू सानप, मनोज परजणे,अशफाक सय्यद आणि नितीन वडमारे यांचा समावेश होता.






