ब्रेकिंग न्यूज

महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ.

हत्या की आत्महत्या?पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत घटनास्थळी.

बीड (प्रतिनिधी): बीड तालुक्यातील पालवन शिवारात एका शेतामध्ये अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. रविवारी (दि. 26 जुलै) सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, पालवन शिवारातील मस्के यांच्या शेतात एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. प्राथमिक पाहणीत तो मृतदेह महिलेचा असल्याचे स्पष्ट झाले.

घटनेचे गांभीरे लक्षात घेऊन बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, स्थानिक गुन्हे शाखेचे शिवाजी बंटेवाड,ग्रामीण पोलीस ठाणे निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी धाव घेतली तसेच फॉरेन्सिक (वैद्यकीय व वैज्ञानिक तपास) पथकही घटनास्थळी दाखल झाले असून पुरावे संकलित करण्याचे काम सुरू आहे.

मृतदेह कुजलेला व अर्धनग्न अवस्थेत आढळल्याने हत्या की आत्महत्या?असल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे. प्रेत ठिकानचा करुन प्रेत जवळपास चार ते पाच दिवसाचे असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.तरी पोलिसांनी अद्याप कोणतेही ठोस कारण किंवा निष्कर्ष जाहीर केलेला नाही. मृत महिलेची ओळख पटविणे, मृत्यूचे नेमके कारण आणि घटनेमागील परिस्थिती यांचा तपास बीड ग्रामीण पोलीस करीत आहेत.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button