ब्रेकिंग न्यूज

स्विफ्ट कारमधून शेळ्यांची चोरी करणारी टोळी जेरबंद.

तीन चोर अटकेत, ₹४.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी.

बीड( प्रतिनिधी)स्विफ्ट कारमधून शेळ्यांची चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार, रोख रक्कम असा एकूण ₹४.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीने वडवणी, धारूर, नेकणूर आणि तलवडा परिसरात शेळ्या चोरीचे किमान सहा गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

पोलीस स्टेशन वडवणी येथे दाखल असलेल्या शेळी चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सुभाष किसन विटकर, बेग रफीक बेग रशीद आणि इमरान चाँद शेख यांना बीड शहरातील खंडेश्वरी देवी मंदिरासमोरील मैदानातून स्विफ्ट कारसह ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत आरोपींनी स्विफ्ट कारमधून दिवसा आणि रात्री विविध भागांत जाऊन शेळ्यांची चोरी केल्याची कबुली दिली. काही दिवसांपूर्वी स्विफ्ट कारमध्ये शेळ्या भरून नेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत टोळीला जेरबंद केले.

आरोपींनी वडवणी, नेकणूर, धारूर आणि तलवडा पोलीस ठाण्यांमध्ये नोंद असलेल्या एकूण सहा शेळी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली असून पुढील तपासासाठी त्यांना मुद्देमालासह वडवणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कामगिरी ही पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधिक्षक, अंबेजोगाई श्रीमती. चेतना तिडके , सहा. पोलीस अधिक्षक, वेंकटराम, यांनच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोउपनि महेश विघ्ने, पोहवा बप्पासाहेब घोडके, दिलीप गित्ते, दिपक खांडेकर, जफर पठाण, अर्जुन यादव चालक गणेश मराडे यांनी केली आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button