ब्रेकिंग न्यूज

परळी(धर्मापुरी) गांजावर स्थानी गुन्हे शाखेची कारवाई.

49 किलो गांजासह 29 लाख 54 हजार 169 रुपयांचा मुद्देमाल जप्त.

बीड (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांच्या अवैध धंद्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, आणखी एका मोठ्या कारवाईत तब्बल 49 किलो गांजासह 29 लाख 54 हजार 169 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी पदभार स्वीकारल्यानंतर एलसीबीच्या कारवायांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात अवैध धंदे, अंमली पदार्थांची तस्करी, चोरी, दरोडे आणि विविध गुन्ह्यांवर सातत्याने धडक कारवाया केल्या जात असून, त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये पोलिसांचा वाढता वचक निर्माण झाला आहे.गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने परळी ग्रामीण पोलिसांच्या मदतीने धर्मापुरी शिवारातील दिनांक 3 जुलै शुक्रवार रोजी अहमदपूर–अंबाजोगाई मार्गावर सापळा रचला. संशयित मारुती सुझुकी ब्रेझा कारची तपासणी केली असता त्यामध्ये 49 किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजासह वाहन असा एकूण 29.54 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या कारवाईत अनिल बिभीषण फड (25) व अरबाज युसूफ सय्यद (23), दोघे रा. धर्मापुरी, ता. परळी यांना अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी ईश्वर नवनाथ फड व श्रीकांत भास्कर फड यांच्या साथीने गांजाची वाहतूक केल्याची कबुली दिली. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्र. 327/2026 अन्वये एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

सदरील कामगिरी नवनीत काँवत, पोलीस अधीक्षक, बीड, श्रीमती चेतना तिडके, अपर पोलीस अधीक्षक, बीड, ऋषीकेश शिंदे, सहा. पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई व शिवाजी बंटेवाड, स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पोलीस हवालदार रामचंद्र केकान, मारोती कांबळे, विष्णु सानप, गोविंद भताने, गोविंद राख, विकास राठोड, पोलीस अंमलदार सचिन आंधळे, बबन सलगर, विकी सुरवसे, चालक अतुल हराळे, सुनिल राठोड सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, बीड तसेच पोलीस ठाणे परळी ग्रामीण चे पोनि/मल्हार शिवरकर, पोउपनि/निमोने, पुजरवाड, पो.हवा/वाले, केदार, पोकळे यांनी मिळून केली आहे.

बीड जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असलेल्या सातत्यपूर्ण आणि धडक कारवायांमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सर्वसामान्य नागरिकांकडून या आक्रमक भूमिकेचे स्वागत होत आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button