शिवाजीनगर भागातून तरुण बेपत्ता.
तरुणाच्या शोधासाठी पोलीस व कुटुंबीयाचे प्रयत्न,आढळल्यास पोलिसांना संपर्क करा.

बीड( प्रतिनिधी)बीड शहरातील शिवाजीनगर परिसरातून एक तरुण बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, यामुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विकास वैजनाथ जाधव हे दिनांक 28 मे 2026 रोजी सकाळच्या सुमारास शिवाजीनगर येथील राजे शहाजी कॉलनी भागातील राहत्या घरातून रागाच्या भरात कोणाला काही न सांगता बाहेर पडले आणि त्यानंतर त्यांचा संपर्क तुटला आहे.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास जाधव वय 24 वर्ष हा तरुण घरातून निघताना जांभळ्या रंगाचा टी-शर्ट व काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट परिधान केली होती. त्यांचा वर्ण काळा सावळा असून ते एमएच 14 एचवाय 7941 (MH 14 HY 7941) क्रमांकाची दुचाकी घेऊन घरातून बाहेर पडले होते.
घटनेनंतर कुटुंबीयांनी नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरात शोध घेतला. मात्र, त्यांचा कोणताही ठावठिकाणा न लागल्याने अखेर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, शिवाजीनगर भागातून काही ठिकाणी माहिती मिळत असल्याचे सांगितले जात असून, त्या अनुषंगाने पोलीस तसेच कुटुंबीयांकडून शोधमोहीम सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांकडून परिसरातील विविध ठिकाणांची पडताळणी करण्यात येत असून, नागरिकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सदर तरुणाबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास,आढळल्यास तात्काळ
8546705605
9766660399
9527675713
या मोबाईल नंबरवर माहिती द्यावी किंवा शिवाजीनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे.






