कंकालेश्वर कुंडात महिलेची उडी घेऊन आत्महत्या.
अवघ्या १२ दिवसांच्या बाळाला सोडून टोकाचे पाऊल,आत्महत्येचे कारण स्पष्ट.

बीड(प्रतिनिधी)बीड शहरातील कंकालेश्वर मंदिर परिसरातील कुंडात एका महिलेने उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज बुधवारी (दि. १० जून) सकाळी उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच पेठ बीड पोलीस ठाण्याचे साहेब पोलीस निरीक्षक उबाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत असून, अवघ्या १२ दिवसांच्या बाळाला घरी सोडून महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माधुरी आनंद सोळुंके (वय ३९) असे मृत महिलेचे नाव असून त्या मूळच्या पिंपळगाव कोलते येथील रहिवासी होत्या. सध्या त्या बीड शहरातील साई पार्क अपार्टमेंट येथे माहेरी मुक्कामी आल्या होत्या. बुधवारी सकाळी त्यांनी कंकालेश्वर कुंडात उडी घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने महिलेचा मृतदेह कुंडातून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.
महिलेने हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणामुळे उचलले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.पेठ बीड पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.







