ब्रेकिंग न्यूज

बियर शॉपीवर धडक कारवाया.

बीड शहर पोलिसांची अवैध बीअर पिण्याची जागा उपलब्ध करून देणाऱ्यांवर कारवाई;खुर्च्या,टेबल जप्त.

बीड शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने शुक्रवार दि. 05 जून 2026 रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास अवैध धंद्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवत शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी बियर शॉपीवर छापेमारी करून ग्राहकांना बेकायदेशीररित्या बीअर पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या दोन इसमांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 68 अन्वये कारवाई केली.

प्राप्त गुप्त माहितीच्या आधारे पंचांना सोबत घेऊन संबंधित ठिकाणी छापेमारी करण्यात आली. यावेळी बीअर शॉपीलगतच्या मोकळ्या जागेत खुर्च्या व टेबल टाकून ग्राहकांना परवानगी नसताना बीअर पिण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याचे निष्पन्न झाले.

पहिली कारवाई :

बार्शी रोड येथील अंकिता बीअर शॉप लगतच्या मोकळ्या जागेत संजय आनंदराव उबाळे (वय 49, रा. पांडुरंगनगर, बार्शी रोड, बीड) हा ग्राहकांना बीअर पिण्यासाठी बेकायदेशीररित्या जागा उपलब्ध करून देताना आढळून आला.

दुसरी कारवाई :

सावता माळी चौकातील राज बीअर शॉप लगतच्या मोकळ्या जागेत सोनाजी भालशंकर (वय 47, रा. जुना पूल, होळवाडा, बीड) हा ग्राहकांना बीअर पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देताना आढळून आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना तिडके मॅडम, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख तसेच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली psi संदीप जाधव,psi महेश जाधव, पोहवा.बावनकर, पोहवा.सय्यद, पोशि/पवार, पो.ह.सोनवणे, पो.शि.शिंदे यांनी केली.

बीड शहरातील बार्शी रोड व सावता माळी चौकात या दोन्ही छापेमारी; महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 68 अंतर्गत कारवाई करण्यात आली.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button