अमोल रोमन यांची अखेर मृत्यूशी झुंज संपली.
टिप्परमधून उडालेल्या दगडाने जखमी अमोल रोमन यांचे निधन

बीड(प्रतिनिधी) बीड शहरातील बार्शी रोडवर धावत्या टिप्परच्या टायरमधून उडालेल्या दगडामुळे गंभीर जखमी झालेल्या अमोल बापूराव रोमन (वय 40, रा. काबाड गल्ली, बीड) यांची अखेर उपचारादरम्यान मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली. त्यांच्या निधनाने शहरात हळहळ व्यक्त केली जात असून कुटुंबीय, नातेवाईक व मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दिनांक 4 जून रोजी दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या दरम्यान बार्शी रोडवरून अमोल रोमन हे घराकडे जात असताना अचानक धावत्या टिप्परच्या टायरमधून अचानक दगड उडून अमोल रोमन यांच्या डोक्याला जोरात लागला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. डोक्याला दगडाचा जबर मार लागल्याने अमोल रोमनी जागेवरच कोसळले सीसीटीव्ही समोर आला आहे. एका रिक्षा चालकांनी त्यांना जखमी अवस्थेत बीड जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना लोटस रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना संभाजीनगर येथे हलविण्यात आले होते.
डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र उपचार सुरू असतानाच आज दिनांक 6 जून शनिवार रोजी सकाळी प्राणज्योत मालवली. अमोल रोमन हे एका खाजगी शिक्षण संस्थेत नोकरीस होते.
दरम्यान, अमोल रोमन हे छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक रोमन तसेच संदीप भैया यांचे कट्टर समर्थकांचे बंधू असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून अनेकांकडून दुःख व्यक्त करण्यात येत आहे. रोमन परिवाराच्या दुःखात पार्श्वभूमी परिवार सामील आहे.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस संबंधित टिप्परचा शोध घेत असून ही घटना अत्यंत दुर्दैवी व वेदनादायी असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.






