ब्रेकिंग न्यूज

सिंधी दारू विक्रेत्यावर पेठ बीड पोलिसांची कारवाई.

240 लिटर दारू जप्त;एक ताब्यात

बीड (प्रतिनिधी) – बीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत पेठ बीड पोलिसांनी सिंधी दारू विक्रेत्यावर कारवाई करत एकास ताब्यात घेतले आहे. या कारवाईत सुमारे 240 लिटर सिंधी दारू व अंदाजे 10 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

पेठ बीड पोलीस स्टेशन हद्दीतील गांधी नगर परिसरात ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी रामेश्वर कचरू गायकवाड (वय 37, रा. गांधी नगर, पेठ बीड) यास ताब्यात घेतले. पेठ बीड पोलिसांनी दारू, मटका, गुटखा आणि जुगार अड्ड्यांविरोधात मोहीम अधिक तीव्र केली असून अवैध दारू विक्री करणाऱ्यांवरही आता विशेष लक्ष केंद्रीत केले जात आहे.

अलीकडेच राज्यात विषारी दारू प्रकरणामुळे अनेकांचे जीव गेल्याच्या घटनांनी चिंता वाढली आहे. अशा पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्री आणि सेवन हा गंभीर सामाजिक व आरोग्याचा प्रश्न बनला आहे.

दारूमुळे होणारे गंभीर दुष्परिणाम.

आरोग्यावर घातक परिणाम : यकृत (लिव्हर) निकामी होणे, हृदयविकार, मेंदूवरील परिणाम आणि मानसिक आजारांचा धोका वाढतो.

विषारी दारूचा जीवघेणा धोका : निकृष्ट किंवा भेसळयुक्त दारूमुळे अंधत्व, शरीर निकामी होणे किंवा मृत्यू होण्याची शक्यता असते.

कौटुंबिक कलह : व्यसनामुळे घरगुती हिंसाचार, आर्थिक संकट आणि कुटुंबातील तणाव वाढतो.

गुन्हेगारी वाढ : अनेकदा दारूच्या नशेत भांडणे, अपघात, हल्ले आणि कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात.

तरुण पिढीवर परिणाम : व्यसनाधीनतेमुळे शिक्षण, रोजगार आणि भविष्य धोक्यात येते.

 ही कारवाई पोलीस निरीक्षक मारोती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गांधी नगर बिट अंमलदार व पोलीस पथकाने केली. शहरात अवैध दारूविरोधातील मोहीम आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button