ब्रेकिंग न्यूज

अपघातात एक गंभीर जखमी;प्रकृती चिंताजनक.

बोअरवेल ट्रकला दुचाकीची धडक,एक गंभीर जखमी.

बीड प्रतिनिधी : बीड शहरातील तेलगाव नाका चौकात आज दि. ३ जून (बुधवार) रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. उभ्या असलेल्या बोअरवेलच्या वाहनाला दुचाकीस्वाराने मागून जोरदार धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त दुचाकीचा क्रमांक MH 23 AV 8867 असा असून, दुचाकीस्वाराने तेलगाव नाका चौकातील उभ्या बोअरवेलच्या गाडीला मागून धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. अपघातात त्या व्यक्तीला गंभीर इजा होऊन बेशुद्ध पडला होता.

अपघातानंतर काही काळ तेलगाव नाका चौकातील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच परिसरात नागरिकांची गर्दी झाली. याची माहिती पेठ बीड पोलिसांना मिळत असताना तात्काळ घटनास्थळी जाऊन वाहतूक सुरळीत केली.जखमी व्यक्तीला तात्काळ उपचारासाठी मदत मिळण्यास काहीसा विलंब झाल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अद्याप समोर आलेली नसून, जखमीची ओळखही स्पष्ट होऊ शकलेली नाही. संबंधित पोलीस यंत्रणेकडून पुढील माहितीची प्रतीक्षा आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button