ब्रेकिंग न्यूज

“पेमेंट सक्सेसफुल मेसेजचा खेळ” बेकरी चालकाला 22 हजार 500 रुपयांचा गंडा.

बीड मध्ये ऑनलाइन ठकबाजीचा प्रकार;ऑनलाइन फसवून करणारी टोळी सक्रिय?

माझ्या पत्नीला ऑपरेशन साठी घेऊन जायचे आहे डॉक्टरला पैसे दिल्याशिवाय ऑपरेशन करणार नाही म्हणत 22 हजार पाचशे रुपयाला गंडा.

बीड(प्रतिनिधी)बीड शहरात ऑनलाइन पेमेंटच्या नावाखाली नागरिकांना गंडा घालणाऱ्या टोळ्यांचा सुळसुळाट वाढत असून, बनावट “पेमेंट सक्सेसफुल” मेसेज दाखवून फसवणूक करण्याचे प्रकार चिंताजनकरीत्या वाढले आहेत. अशाच एका धक्कादायक प्रकारात बार्शी नाका परिसरातील बेकरी चालकाची तब्बल 22 हजार 500 रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहरातील बार्शी नाका भागात दिपक पवार यांची बेकरी आहे. त्यांच्या दुकानात आलेल्या एका अनोळखी इसमाने “पत्नी गंभीर आजारी असून तिला तातडीने ऑपरेशनसाठी घेऊन जायचे आहे व पैसा दिल्याशिवाय डॉक्टर ऑपरेशन करणार नाही त्यामुळे पैशांची नितांत गरज आहे,” अशी भावनिक बतावणी करत विश्वास संपादन केला. त्यानंतर “मी ऑनलाइन पैसे पाठवतो, तुम्ही मला रोख रक्कम द्या,” अशी विनंती केली.

यावर विश्वास ठेवून दीपक पवार यांनी संबंधित व्यक्तीस मोबाईल नंबर दिला. काही क्षणांतच त्यांच्या मोबाईलवर पेमेंट ‘सक्सेसफुल’ झाल्याचा मेसेज दिसला. व्यवहार पूर्ण झाल्याचा समज करून त्यांनी त्या व्यक्तीस 22 हजार 500 रुपये रोख स्वरूपात दिले.

मात्र काही वेळानंतर खात्यात पैसे जमा झाले नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी बँक बॅलन्स तपासला असता कोणतीही रक्कम जमा न झाल्याचे स्पष्ट झाले. संशय आल्याने ज्या मोबाईल नंबरवरून “सक्सेसफुल” मेसेज आला होता तसेच स्कॅनरशी संबंधित नंबरवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल बंद लागत असल्याचे समोर आले. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

दरम्यान, बीड शहरात मागील काही महिन्यांपासून किराणा दुकाने, पानटपऱ्या, भेळ गाड्या, बेकरी तसेच छोट्या व्यावसायिकांना बनावट पेमेंट स्क्रीनशॉट, डमी UPI ॲप आणि खोटे ‘सक्सेसफुल’ मेसेज दाखवून फसवले जात असल्याच्या घटना वाढल्याची चर्चा आहे. अनेक व्यापारी पोलिसांत तक्रार करण्यास पुढे येत नसल्याने अशा टोळ्यांचे मनोबल वाढत असल्याची खंत व्यक्त होत आहे.

“खात्यात पैसे जमा झाल्याची खात्री झाल्याशिवाय रोख रक्कम देऊ नका,” असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. अकाउंटवर पैसे जमा झाल्याच्या खात्री झाल्याशिवाय ऑनलाइन पेमेंट किंवा कॅश देऊ नये असे देखील आवाहन पोलिसां कडून करण्यात आले आहे. अशा फसव्या ॲपचा शोध लावून सायबर पोलिसांनी कठोर कारवाई करावी.

 असे मोबाईल फोन पे गुगल पे ॲप वापरून अनेकांची फसवणूक करणारी टोळी पक्षी सक्रिय असल्याचा देखील संशय व्यक्त होत आहे त्यामुळे अशा टोळीचा पोलिसांनी शोध घेऊन तात्काळ कारवाई करण्याची मागणी नागरिकांत होत आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button