बीड सायबर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी.
ऑनलाइन फसवणुकीतील 1.33 लाखांची रक्कम परत मिळवली”

बीड (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यात मागील काही महिन्यांमध्ये ऑनलाईन फसवणूक केल्याच्या घटनेमध्ये वाढ झाली असून तक्रारदारांना बीड सायबर पोलिसांनी पैसे परत मिळवून देण्यात आले होते. अशाच एका ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकारात बीड ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकरणात तत्पर तपास करत बीड सायबर पोलिसांनी तक्रारदाराची फसवणूक झालेली संपूर्ण रक्कम परत मिळवून देत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कारवाईमुळे सायबर गुन्हेगारांवर पोलिसांनी प्रभावी अंकुश ठेवला असल्याचे दिसून येत आहे.
सायबर पोलीस ठाणे बीड येथे ऑनलाइन फसवणुकीप्रकरणी गुन्हा क्रमांक 31/2025 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 318(4), 3(5) तसेच आयटी अॅक्ट 2000 मधील कलम 66 व 66(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात तक्रारदार मिनाक्षी दत्ता आंधळे, रा. हिंगणी, ता. जि. बीड यांच्या मोबाईल व सिमकार्डचा गैरवापर करून आरोपींनी त्यांच्या बँक खात्यातून तब्बल 1 लाख 33 हजार 995 रुपये फसवणूक करून काढून घेतले होते.
तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व बँकांकडून प्राप्त माहितीद्वारे तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपींकडून सुरुवातीला 89 हजार रुपये जप्त करण्यात आले. दरम्यान, मुख्य आरोपीचा शोध पुणे, अहिल्यानगर व धाराशिव जिल्ह्यांत घेण्यात आला, मात्र तो मिळून आला नव्हता.
अखेर दिनांक 2 जून 2026 रोजी टेक्निकल सेल विभागाकडून मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे मुख्य आरोपी श्रीकृष्ण गोवर्धन आंधळे (रा. हिंगणी, ता. जि. बीड) याला चौसाळा येथून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर उर्वरित 45 हजार रुपयेही जप्त करण्यात आले. यामुळे तक्रारदाराची फसवणूक झालेली संपूर्ण रक्कम परत मिळवण्यात पोलिसांना यश आले.
सदर आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याला जिल्हा कारागृह बीड येथे जेलबंद करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत,प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना तिडके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश केळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक भारत जायभाये, पोहेकॉ विजय घोडके, पोलीस अंमलदार निलेश उगलमुगले व अंकुश तोटेवाड यांच्या पथकाने केली.






