गांजाच्या साठ्यावर छापा.
७.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त,एक ताब्यात,स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

बीड( प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील परळी शहरातील रामनगर भागात राहत्या घरात गांजा साठवून विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत मोठा गांजाचा साठा जप्त केला. या कारवाईत एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून सुमारे ७ लाख ८७ हजार ७४० रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परळी शहरातील रामनगर परिसरात राहत्या घरात गांजा साठवून विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती बीड स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पथकाने तत्काळ परळी येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने राजीव/राजू मोहिते यांच्या घरावर छापा टाकला. छाप्यामध्ये घरात मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा आढळून आला.
या कारवाईत राहुल राजू मोहिते (वय २६, रा. रामनगर, परळी) याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी आरोपीकडून २६ किलो गांजा जप्त केला असून त्याची अंदाजे किंमत ₹७,८७,७४० इतकी असल्याचे सांगण्यात आले.
ही कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना तिडके मॅडम,अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या नेतृत्वात करण्यात आली पो.हे.कॉ.केकान,पों.ना. भताने,पो आंधळे व परी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांसह परळी पोलिसांनी कारवाई केली.जप्त केलेला गांजा पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे
गांजाच्या सेवनामुळे तरुणांमध्ये व्यसनाधीनता वाढण्याची शक्यता असते. यामुळे स्मरणशक्ती कमी होणे, मानसिक अस्थिरता, नैराश्य, अभ्यास व कामातील लक्ष विचलित होणे तसेच आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे अशा अमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.










