ब्रेकिंग न्यूज

महिलेसह तिच्या अल्पवयीन मुलीला व मुलाला अमानुष मारहाण. 

घरासमोर पत्ते खेळण्यास विरोध केल्याने बेदम मारहान करत घरावर दगडफेक.

बीड जिल्ह्यात महिला वरील वाढते अत्याचार व अमानुष मारहाण होण्याच्या घटनात वाढ झाली असून तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीत  रंजेगाव येथील पीडित सुवर्णमाला बनसोडे या महिला घरी एकट्या असताना रात्री काही गावातील तरुणांनी त्यांच्या घरासमोर लघुशंका केली, दगडफेक केली व घरासमोर पत्ते खेळत बसले होते. यास विरोध करत “घरासमोर पत्ते खेळू नका, लघुशंका करू नका, दगडफेक करू नका” असे सांगितल्याचा राग मनात धरून आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ करत टांभी, बेल्ट, काठी व चप्पलने न दाखवायला येणाऱ्या जागेवर अमानुष मारहाण केली.

या हल्ल्यात पीडित महिलेच्या गळ्यातील 08 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेण्यात आले, तसेच त्यांच्या 12 वर्षीय मुलीला उचलून फेकण्यात आले व 15 वर्षीय मुलाला बेल्टने बेदम मारहाण करण्यात आली.

घडलेला सर्व प्रकार व्हिडिओमध्ये कैद झालेला आहे.जखमींना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल बीड येथे दाखल करण्यात आली.

दलितांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना वाढत आहेत आरोपीवर गुन्हे दाखल करून अटक करून पिडीत कुटुंबीयांना न्याय मिळालाच पाहिजे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button