307 च्या गुन्ह्यात फरार आरोपी अटक.
तीन महिन्यांपासून फरार आरोपीला DB पथकाच्या बेड्या.

बीड (प्रतिनिधी) – बीड शहरातील बार्शी रोडवरील महाराष्ट्र प्रकाश आंबेडकर नगर परिसरात धुलीवंदनाच्या दिवशी झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी फरार असलेल्या आरोपीला पेठ बीड पोलीस ठाण्याच्या DB पथकाने अखेर अटक केली आहे. तब्बल तीन महिन्यांपासून आरोपी फरार होता.
मिळालेल्या माहितीनुसार, शिल्लक कारणावरून अमोल कांबळे या तरुणाला डोंगरे कुटुंबीयांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत अमोल कांबळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध जीवघेणा हल्ला (कलम 307) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यातील फरार आरोपी रोहन उर्फ कोल्ह्या शिवाजी डोंगरे (वय 21) याला गोपनीय माहितीच्या आधारे प्रकाश आंबेडकर नगर, इमामपूर रोड परिसरात सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. अटकेनंतर पुढील तपासासाठी आरोपीला पेठ बीड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक मारोती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली PSI शहा, पोह माने, पो.अं. गुजर, गिरी व परजने यांनी पार पाडली.







