ब्रेकिंग न्यूज

सर्वांसमोर तरुणीने तोंडात मारल्याने आत्महत्या !

"माझा शेवटचा फोन आहे"म्हणत घेतला गळफास.

बीड( प्रतिनिधी) सर्व समोरच तरुणीने तरुणाच्या गालात झापड मारल्याने मानसिक तणावात गेलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चंद्रहार राजेभाऊ शिंदे असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १३ मे रोजी दुपारच्या सुमारास करेवाडी रोडवरील लाल माती परिसरात एका तरुणी आणि चंद्रहार शिंदे यांच्यात शाब्दिक वाद झाल्याची चर्चा आहे. या घटनेदरम्यान सर्वांसमक्ष अपमान झाल्याने चंद्रहार मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाला होता, अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली. परंतु तरुणीने असे प्रत्येक का केले याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

त्यानंतर १४ मे रोजी सायंकाळी चंद्रहारने आपल्या वडिलांशी फोनवर “हा माझा शेवटचा फोन आहे,” असे सांगितल्याचे समोर आले. त्यानंतर त्याचा मोबाईल बंद झाल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला.

शोधमोहीमेदरम्यान मौजे करेवाडी शिवारातील मुंगळ्याचा माळ परिसरात एका झाडाजवळ चंद्रहार आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच परिसरात शोककळा पसरली.

या प्रकरणी संबंधित तरुणीविरोधात सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे. मृत्यूमागील नेमके कारण आणि घटनेपूर्वीच्या परिस्थितीचा तपशील तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

या घटनेनंतर अपमान, सामाजिक दबाव आणि मानसिक तणाव यांसारख्या मुद्द्यांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, व्यक्तीच्या वर्तनातील बदल, एकटेपणा किंवा निराशेची चिन्हे दिसल्यास कुटुंबीयांनी संवाद वाढवणे आणि वेळेवर मदत मिळवून देणे गरजेचे ठरते.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button