आमदार संदीप क्षीरसागर “ऑन द स्पॉट”
अपघात टाळण्यासाठी रस्ता रुंदीकरणास सुरुवात;संदीप भैय्या साठे चौकात ठाण मांडून.

बीड (प्रतिनिधी)बीड शहरातील आण्णाभाऊ साठे चौकात वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अपघातांचा सापळा ठरत असलेल्या या चौकातील अतिक्रमणावर अखेर कारवाईला सुरुवात करण्यात आली असून आमदार Sandeep Kshirsagar यांनी स्वतः साठे चौकात ठाण मांडत रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला गती दिली.
शनिवारी सायंकाळी आमदार संदीप क्षीरसागर यांनी संबंधित अधिकारी व यंत्रणेसह घटनास्थळी पाहणी केली. चौकातील वाहतुकीस अडथळा ठरणारे अतिक्रमण हटवून रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे रुंदीकरण करण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. अतिक्रमणामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होत असून अरुंद रस्त्यामुळे सातत्याने अपघात घडत असल्याची बाब समोर आली होती.
बीड शहरातील जाणा रोडवर गेल्या आठवड्यात कंटेनर खाली येऊन एक महिलेसाठी मृत्यू झाला होता.साठे चौक हा शहरातील महत्त्वाचा व वर्दळीचा भाग असल्याने येथे अनेकदा वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. रस्ता रुंदीकरणामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असून नागरिकांना अधिक सुरक्षित प्रवास करता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
वारंवार घडणाऱ्या अपघातांची गंभीर दखल घेत तातडीने काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. “नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील,” असा संदेश यावेळी प्रशासनाला देण्यात आल्याची चर्चा परिसरात होती.











