काळाबाजार : पेट्रोल 180 तर डिझेल 150 रुपये लिटर ?
पुरवठा विभाग झोपेत;नळाला पाणी आल्यासारखं पेट्रोल पंपावर कॅन घेऊन वाहनधारकांच्या रांगा.

बीड (प्रतिनिधी): जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून इंधन साठा विस्कळीत असून पेट्रोल-डिझेल पुरवठा सुरळीत होत नाही. शहरातील पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. काही ठिकाणी कॅन व ड्रममध्ये इंधन विक्री होत असल्याने काळाबाजाराला खतपाणी मिळत आहे. परिणामी बीड शहरातील काही भागात पेट्रोल डिझेलचा साठा करत पेट्रोल ₹180 तर डिझेल ₹150 प्रति लिटर दराने विक्री होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे पुरवठा विभागाने या घटनेचे गांभीर्य घेऊन तत्काळ अशा काळाबाजार करणाऱ्या वर कठोर कारवाई करण्याची गरज आहे
जिल्ह्यातील इंधन तूटवड्याकडे पुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. “पंपचालकांवर नियंत्रण नाही का?” असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. पंपावर गर्दी झाली की अचानक मॅनेजर सांगतात की डिझेल पेट्रोल संपले आहे यामुळे वाहनर दोन ते तीन तास उन्हात रांगेत लागून त्यांना इंधन मिळत नसल्याने संताप व्यक्त करत आहेत.
काही पंपांवर तर पाणीटंचाईप्रमाणे कॅन घेऊन नागरिक रांगा लावत असल्याचे चित्र दिसत आहे. पुरवठा विभाग याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचे देखील चित्र सध्या बीड जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.
दिनांक 2 मे रोजी बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत काळ्या बाजारात पेट्रोल विक्री होत असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळताच त्यांनी कारवाई करण्यात आली या कारवाईत त्यांना तीस हजाराचा गुटखा आढळल्याने तात्काळ त्या किराणा दुकानावर कारवाई करण्यात आली. तसेच त्याच किराणा दुकानात जवळपास दोन पोती पिण्यात पाण्याच्या रिकाम्या बाटल्या आढळल्याने या दुकानात इंधन विक्री होत असल्याची स्पष्ट झाले.
बीड शहरातील पेट्रोल पंपावर वाहनधारक गर्दी करत असून वाहनाच्या लांब लांब रांगा लागत असल्याने बीड शहरातील वाहतूक कोणी देखील वाढली आहे.
दरम्यान, बीड जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून इंधन पुरवठा सुरळीत करावा आणि काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.









