पेठ बीड मध्ये गुटख्याच्या साठ्यावर छापा.
६४,८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त,डिबी पथकाची कारवाई.

बीड (प्रतिनिधी) राज्य सरकारने गुटखा तसेच तंबाखूजन्य पदार्थावर बंदी असताना देखील बीड जिल्ह्यात मात्र खुलेआम गुटखा विक्री होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे याकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे.
दिनांक 12 एप्रिल रविवार रोजी पेठ बीड पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने प्रतिबंधित गुटख्याच्या साठ्यावर छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण ६४,८४० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.
पोलीस उपनिरीक्षक मन्सूर शहा यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे बाबा चौक, इस्लामपुरा येथे छापा टाकण्यात आला. यावेळी प्रतिबंधित गुटख्याचा साठा आढळून आला असून तो जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी आरोपी अफरोज तांबोली हा फरार असून त्याच्या विरोधात पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १००/२०२६ नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हा भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, २२३, २७४, २७५ अन्वये दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मन्सूर शहा हे करत आहेत.तसेच बार्शी नाका, मोमीनपुरा भागात देखील गुटखा माफियावर कारवाई करण्यात यावी
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पेठ बीड पोलीस निरीक्षक मारोती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि मन्सूर शहा, पोलीस हवालदार माने तसेच पोलीस अंमलदार गिरी व राख यांच्या पथकाने केली.






