भव्यदिव्य श्रीकृष्णाश्रम-१०८ यज्ञ कुंडासह नेत्रदिपक रोषणाई
श्रीराम कथा,महाविष्णू यज्ञा ची जोरदार तयारी


भगवान श्रीकृष्ण आश्रम केज येथे श्रीराम कथा व १०८ कुंडी महाविष्णु यज्ञाची तयारी पूर्ण,भव्य यज्ञ मंडपाने भाविकांचे लक्ष वेधले
अंबाजोगाई/प्रतिनिधी:—-
भगवान श्रीकृष्ण आश्रम केज येथे श्रीराम कथा व १०८ कुंडी महाविष्णु यज्ञाची तयारी पूर्णत्वाला आली असुन भव्य यज्ञ मंडपाने भाविकांचे लक्ष वेधले आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की,अहमदपूर – अहिल्या नगर राष्ट्रीय महामार्गा लगत असलेल्या केज येथील भगवान श्रीकृष्ण आश्रम,परिसरात श्रीकृष्ण मंदिराच्या भव्य भूमिपूजन सोहळ्या निमित्त १०८ कुंडी भव्य महाविष्णु यज्ञयाग,व रामायणाचार्य ह.भ.प. रामराव ढोक महाराज नागपूर यांच्या संगीत रामकथा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.हा धार्मिक कार्यक्रम बुधवार दि.११ मार्च ते गुरुवार दि. १९ मार्च या कालावधीत संपन्न होणार आहे.
या महाविष्णु यज्ञ,राम कथा व किर्तन सोहळ्या साठी हिमाचल प्रदेश येथील महंत तपस्वी परमहंस श्री १००८ स्वामी चिन्मय पुरीजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.संगीत रामकथा रामायणाचार्य ह.भ.प. रामराव महाराज ढोक नागपूर यांच्या रसाळ वाणीतुन सादर होणार असून दररोज सकाळी ८ ते ११ वाजता महाविष्णु १०८ कुंडीयज्ञ दुपारी २ ते ५ संगीतमय तुलसी रामायण कथा, सायंकाळी धार्मिक विधी, रात्री ८ ते १० हरीकीर्तन व हरिजागराचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात विविध संत-महात्म्यांची कीर्तन सेवा लाभणार असून भाविकांसाठी दररोज महाप्रसाद व अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली आहे.परिसरातील सर्व भाविकांनी व धर्मप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पुण्यलाभाचा लाभ घ्यावा,असे आवाहन भागवत भुषण ह.भ.प.केशव महाराज शास्त्री व श्रीकृष्ण आश्रम परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.यज्ञ मंडपाचे काम पुर्णत्वास आले असून राजस्थान येथील कारागीर हे दिड महिन्या पासून यज्ञ मंडप उभारणीचे काम करीत असून,हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या मंडपात १०८ यज्ञ कुंड तयार करण्यात आले असून त्यांना गोमूत्र, गोमय,मृतीका यांनी सारवण करुन रंगरंगोटी करण्यात येत आहे. श्रीराम कथा मंडपाचे काम पुर्णत्वास आले असून ५ हजार भाविकांची बसण्याची व्यवस्था होईल असा वॉटर प्रूफ मंडप उभारण्यात आला असून भोजन मंडपाचे कामही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती भगवान श्री कृष्ण आश्रमाचे संस्थापक भागवत भुषण ह.भ.प. केशव महाराज शास्त्री यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.




