शनी मंदिराची भूमी अभिलेख अधिकाऱ्या कडून स्थळ पाहाणी !
शनी मंदिराच्या गेटला कुलूप,तक्रारदार खोड गैरहजर असल्याने चर्चेला उधाण.

https://youtu.be/vR1IWJJ162k?si=Ls9ZAYUf01vcZps-
बीड शहरातील पेठ बीड भागात असलेल्या शनी मंदिर परिसरातील वादाला पुन्हा एकदा उधाण आले आहे. अनेक वर्षांपासून ट्रस्टी आणि इतर संबंधितांमध्ये मालकी व ताब्याबाबत मतभेद सुरू असून हे प्रकरण विविध स्तरावर प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर आज भूमि अभिलेख कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून परिस्थितीची नोंद घेतली.
सोमवारी दुपारच्या वेळी भूमी अभिलेख अधिकारी व कर्मचारी शनी मंदिर परिसरात दाखल झाले. यावेळी शनी मंदिराच्या मुख्य गेटला कुलूप असल्याने स्थळ पाहणी साठी आलेल्या अधिकाऱ्यांना गेट समोर बसूनच स्थळ पाहणी करावी लागली यावेळी नागरिक उपस्थित होते. शनी मंदिर परिसर तक्रारीबाबत जागेची मोजणी, सीमारेषा आणि प्रत्यक्ष ताबा कोणाकडे आहे, याबाबत प्राथमिक माहिती गोळा करण्यात आल्याचे समजते. मात्र, पाहणीदरम्यान तक्रारदार व्यक्ती अचानक अनुपस्थित झाल्याची व मोबाईल बंद असल्याने चर्चा परिसरात रंगली.यामुळे याविषयी विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
दरम्यान, प्रत्यक्ष पाहणीवेळी संबंधित जागेवर काही रहिवासी वास्तव्यास असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. काही बांधकामे व वापर सुरू असल्याची नोंद अधिकाऱ्यांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे पुढील कारवाई कोणत्या दिशेने होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शनी मंदिर परिसरातील हा वाद मिटावा आणि योग्य तो निर्णय व्हावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. भूमि अभिलेख विभागाच्या अहवालानंतर प्रशासन कोणती भूमिका घेते, यावर पुढील घडामोडी अवलंबून राहणार आहेत.










