ब्रेकिंग न्यूज

पोलीस कर्मचारी सावंत यांचे अपघाती निधन.

बदली झाल्यापासून पोलीस सावंत तणावाखाली वकिलांना केलेल्या चॅटिंग मधून उघड ;पोलिस दलात शोककळा.

 

बीड (प्रतिनिधी) बीड शहरातील पंचशील नगर भागात राहणारे सौदागर माणिकराव सावंत (वय ४७) यांचे अपघाती निधन झाले. बीड शहर वाहतूक शाखेत काम करून सध्या परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सावंत हे ड्युटी आटोपून रात्री बीडकडे घरी येत असताना, घरापासून काही अंतरावरच पंचशील नगर भागात त्यांचा अपघात झाला. अपघातात त्यांना जबर मार लागल्याने घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. अपघातानंतर त्यांना बीड येथील खाजगी रगुन आलयात उपचार दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरने वृत्त घोषित केले.

बीडवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात बदली झाल्यानंतर सावंत हे मॅटमध्ये गेले होते आणि आजच त्यांची तारीख होती. बदलीनंतर ते मानसिक तणावाखाली असल्याची माहिती मिळत आहे.

बीड पोलीस दलातील अनेक कर्मचारी बीड मधून जिल्ह्यात इतर बदल्यां झाल्यापासून तणावाखाली असून काही कर्मचारी मॅटमध्ये गेले आहेत. सावंत हे देखील मॅटमध्ये गेले होते; मात्र नियतीने त्यांच्यावर घाला घातल्याने त्यांचे अपघाती निधन झाले. या घटनेमुळे पोलिस दलासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button