लक्ष्मी जिनिंग अँड ऑइल मिलला भीषण आग.
अग्निशामक दलाच्या धाडसी प्रयत्नाने मोठी दुर्घटना टळली.

बीड(प्रतिनिधी)बीड शहरापासून जवळच असलेल्या बहिरवाडी M.I.D.C. परिसरातील लक्ष्मी जिनिंग अँड ऑइल मिल येथे संध्याकाळी 04.44 वाजता अचानक भीषण आग लागण्याची घटना घडली.
अचानक लागलेल्या आगीने काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले.परिसरात मोठ्या प्रमाणावर ऑईल व केमिकल्स असल्याने परिस्थिती धोकादायक बनली होती.
आगीची तीव्रता अधिकच वाढल्याने याची माहिती बीड अग्निशामक दलाला दिल्यानंतर तात्काळ
बीड अग्निशमन दलाचे वाहन कर्मचारी हे घटनास्थळी येऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यासह घटनास्थळी दाखल होऊन आटोक्यात आणली.
अग्निशामक दलाचे वाहन क्रमांक ( MH 02 GH 5732) तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन अधिकारी किशोर जाधव, लीडिंग फायरमन कृष्णा जंगले आणि फायरमन रमेश आदमाने यांनी तत्काळ बचावकार्य सुरू केले.
आगीचा फैलाव मोठा असून केमिकल्सचा साठा असल्याने गेवराई नगरपरिषदेचे एक तसेच गेवराई बाजार समितीचे एक अशा आणखी दोन अग्निशमन वाहनांना पाचारण करण्यात आले. सर्व तिन्ही वाहनांच्या मदतीने केलेल्या अथक प्रयत्नांनंतर आग पूर्णतः आटोक्यात आणण्यात यश मिळाले.
सुदैवाने या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही मोठी दिलासादायक बाब आहे.
अग्निशमन दलाच्या वेळीच झालेल्या धाडसी हस्तक्षेपामुळे मोठ्या दुर्घटनेपासून बचाव झाल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.







