ब्रेकिंग न्यूज

बीडमध्ये भटक्या कुत्र्यांचा कहर ! विद्यार्थी नागरिक भयभीत.

नसबंदीसाठी धरलेली कुत्रे रातोरात सोडून एजन्सीने गाषा गुंडाळला.

बीड (प्रतिनिधी) बीड शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बीड शहरात कुत्र्यांचे टोळके मुक्तपणे फिरताना दिसत असून अनेक नागरिक व विद्यार्थ्यांना चावा घेतल्याच्या घटना समोर येत आहेत यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर कुत्र्यांच्या नसबंदीच्या कामासाठी नियुक्त केलेल्या एजन्सी कागदपत्राची पूर्तता नसण्याची देखील स्पष्ट दिसत आहे.

नगरपालिकेकडून कुत्र्यांच्या नसबंदीचे टेंडर ‘पीपल फॉर ॲनिमल’ या एजन्सीला देण्यात आले होते. मात्र ही एजन्सी नव्याने स्थापन झालेली असून तिच्याकडे आवश्यक परवाने व ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया (AWBI) चे प्रमाणपत्र नसल्याची माहिती समोर आली आहे. २०२५ मध्ये नोंदणीकृत असलेल्या या एजन्सीला नियमबाह्य पद्धतीने टेंडर देण्यात आल्याचा आरोप होत आहे.तसेच या एजन्सी मध्ये बालकामगारा कडून काम करुन असल्याचे देखील उघड झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नसबंदीच्या कामात मोठा गैरव्यवहार झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रत्यक्षात कमी कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करून कागदोपत्री संख्या वाढवून दाखवली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. लाखो रुपयांचे टेंडर असताना अंदाजे पाच लाख रुपये उचलल्याचीही चर्चा सुरू आहे.

दरम्यान, पार्श्वभूमीच्या प्रतिनिधींनी शहरातील एका नसबंदी केंद्राची पाहणी केली असता तेथे ५० ते ८० कुत्रे बंदिस्त अवस्थेत आढळले. मात्र संबंधित कर्मचाऱ्यांना कुत्र्यांची नोंद,त्यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रिया किंवा त्यांना कुठून आणले व कुठे सोडले याबाबत कोणतीही ठोस माहिती देता आली नाही. अधिक धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणी बालकामगार कार्यरत असल्याचेही उघड झाले असून त्याचे पुरावे म्हणून आधार कार्ड उपलब्ध आहेत.

संबधीत एजन्सीच्या मालकाशी संपर्क साधला कागदपत्राविषयी विचाराणा केली असता त्यांनी कायमस्वरूपी परवाना नसल्याचे मान्य केले. त्यामुळे अशा एजन्सीला नगरपालिकेने मान्यता कशी दिली, हा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच शस्त्रक्रियेसाठी धरून आणलेले शेकडो कुत्रे अचानक एजन्सीने काम बंद करून शेकडो कुत्रे सोडून दिल्यामुळे शहरात पुन्हा कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याचे दिसून येत आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे नगरपालिकेची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून प्रशासन आणि संबंधित एजन्सी यांच्यात काही संगनमत होते का,अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. बीडसह गेवराई नगरपालिकेतही याच एजन्सीला काम दिल्याची माहिती मिळत असून देयके देण्यापूर्वी सर्व कागदपत्रांची सखोल चौकशी करावी, जर काळुत्र पूर्तता नसेल तर त्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द देखील करण्यात यावा अशी मागणी होत आहे.

 संबंधित एजन्सीला परवाना कोणत्या आधारावर दिला परवाना असेल तर ती एजन्सी सर्व साहित्य व वाहन घेऊन पळून का गेली याची सत्यता पडताळण्याची गरज आहे. तसेच संबंधित कंपनीने एजन्सीने काम बंद करताना नगरपालिकेला कळवले आहे का किंवा लेखी पत्र दिले आहे का? हे lदेखील तपासण्याची गरज आहे जर न सांगताच काम बंद केले असतील तर संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा.

शहरातील वाढत्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button