अनोळखी इसमाचा अपघाती मृत्यू.
अज्ञात वाहनाची धडक,तोंडावरून वाहन गेल्याने पटवण्याचे पोलिसांचे आवाहन.

बीड दि.२८ (प्रतिनिधी) : बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोलापूर-धुळे महामार्गावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना 28 एप्रिल 2026 रोजी घडली असून, संबंधित मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी नागरिकांना आवाहन बीड ग्रामीण पोलीसांनी केले आहे.
या बाबत, सरकारी दवाखाना, बीड येथुन एम.एल.सी क्र.5246 दि. 28-04-2026 अन्वये प्राप्त झाली की, बीड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत सोलापुर धुळे माहामार्ग रोडवर एक अनोळखी इसम वय-35 ते 40 वर्ष नाव गाव माहीत नाही. यास अज्ञात वाहनाने धडक देवुन त्यांचे अंगावरुन गाडी गेली असावी. त्यामुळे सदर अनोळखी इसमाच्या प्रेताचा चेंदामेंदा झालेला आहे. सदरील मृत इसमाची अद्याप ओळख पटलेली नसून, पोलिसांकडून ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संबंधित मृत इसमाच्या अंगावर नाईट पॅन्ट असून त्यावर इंग्रजीत “Kill Will” असे अक्षर दिसत आहे. तसेच त्याने निळ्या रंगाचे कपडे परिधान केले असून पायात “Filer” कंपनीचे सॅंडल असल्याचे दिसून येत आहे. या घटनेप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, संबंधित मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. या बाबत काही माहिती असल्यास किंवा कोणी मिसींग किंवा कसे असेल बीड ग्रामीण पोलीस स्टेशन फोन क्र. 022442, 0222422 चौकशी अमंलदार मो. क्र.9822342082, प्रभारी अधिकारी मो.न. 7722035209 यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन बीड ग्रामीण पोलिसांनी केले आहे.









