ब्रेकिंग न्यूज
पत्नी ड्युटीला जातात तलाठ्याने गळफास घेतला गळफास.
बारा दिवसापूर्वीच लग्न झाले होते;आंबेजोगाईतील धक्कादायक घटना.

बीड : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडच्या अंबाजोगाईतील मोरेवाडी परिसरात एका नवविवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
अंबाजोगाईतील मोरेवाडी या ठिकाणी भाड्याने खोली घेऊन राहत होते. गणेश दत्तू कोळी असे मृत तरुणाचे नाव असून ते चंद्रपूर महसूल विभागात तलाठी पदावर कार्यरत होते. अवघ्या १२ दिवसांपूर्वीच मृत गणेश कोळी यांचा विवाह झाला होता. अंबाजोगाई येथील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील फॉरेन्सिक विभागात कंत्राटी पद्धतीने त्यांची पत्नी कार्यरत आहे. पत्नी ड्यूटीवर गेलेली असताना गणेश कोळी यांनी खोलीतील लोखंडी हुकाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करत आहेत.






