ब्रेकिंग न्यूज

माने कॉम्प्लेक्स परिसरात ‘जादूटोणा’!

मुलीच्या फोटोवर खिळा आणि बाहुली झाडाला टांगल्याने खळबळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

 बीड (प्रतिनिधी)बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात ‘जादूटोणा’ची चर्चा; बीड(प्रतिनिधी)बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात एका झाडाला मुलीचा फोटो, काळी बाहुली आणि खिळा लावलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले असून काहींनी याचा संबंध जादूटोणा अथवा अघोरी प्रकाराशी जोडण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अशा घटनांकडे अंधश्रद्धेच्या नजरेतून न पाहता विवेकाने पाहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माने कॉम्प्लेक्स परिसरातील एका झाडावर एका मुलीचा फोटो लावलेला असून त्यावर खिळा मारण्यात आला आहे. त्यासोबत काळ्या रंगाची बाहुलीही टांगण्यात आल्याचे दिसून आले. हा प्रकार पाहून काही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून परिसरात चर्चा रंगल्या आहेत.

सध्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग असताना समाजात अजूनही अंधश्रद्धा, जादूटोणा आणि भीती पसरवणाऱ्या गोष्टींना खतपाणी घालण्याचे प्रकार घडताना दिसतात. तज्ज्ञांच्या मते, अशा गोष्टींमुळे मानसिक भीती निर्माण होते, मात्र त्यामागे कोणतेही वैज्ञानिक आधार नसतात. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावरील अफवा किंवा अप्रमाणित दाव्यांवर विश्वास न ठेवता सत्यता पडताळून पाहावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

दरम्यान, संबंधित प्रकार नेमका कोणी आणि कोणत्या उद्देशाने केला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मात्र, या घटनेमुळे परिसरात चर्चांना उधाण आले आहे. अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता कायदा, विज्ञान आणि विवेक यांवर भर देण्याची गरज असल्याचे सुजाण नागरिकांकडून सांगितले जात आहे. मात्र या यादीतून प्रकाराची चर्चा शहरभर सुरू होती.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button