ब्रेकिंग न्यूज

पो.नि.शितलकुमार बल्लाळ यांचा पहिला दणका ! “चक्री” जुगारावर.

५५ हजारांचा मुद्देमाल जप्त,एक अटकेत.दोन नंबर वाल्यांनी बल्लाळ यांचा धसका.

बीड (प्रतिनिधी) बीड पोलीस दलात कर्मचाऱ्यांच्या बदल्यानंतर दोन दिवसापूर्वी पोलीस अधिकारी,ठाणेप्रमुखांच्या बदल्या झाल्याने बीड शिवाजीनगर पोलीस ठाणे प्रमुख शीतलकुमार बल्लाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शितलकुमार बल्लाळ हे शिस्तबद्ध व कडक अधिकारी म्हणून त्यांची पोलीस दलात ओळख आहे.

 पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे प्रमुखाची सूत्रे हाती घेताच पहिला दणका हा ऑनलाईन चक्री जुगार वाल्यांना दिला.

 बीड शहरातील नगर रोड भागातील ऑनलाइन चक्री जुगार अड्ड्यावर शिवाजीनगर पोलिसांनी धडक कारवाई करत एकाला रंगेहात अटक केली. या कारवाईत कॉम्प्युटर साहित्य व रोख रक्कमेसह एकूण ५५ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २६ मे २०२६ रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पथक नगर रोड परिसरात पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, नगर रोडवरील मुज्जू कुशन वर्कच्या पाठीमागे एका पत्र्याच्या शेडसमोर सार्वजनिक ठिकाणी लोकांकडून पैसे घेऊन ऑनलाइन ‘चक्री’ नावाचा जुगार खेळवला जात आहे.

माहितीची खातरजमा करून पोलिसांनी दोन पंचांसमक्ष दिनांक 26 मे मंगळवार रोजी सायंकाळी सुमारे ७:४० वाजण्याच्या दरम्यान संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच तेथे उपस्थित असलेले इतर जुगारी पळून गेले. मात्र पोलिसांनी घटनास्थळावरून एका व्यक्तीला ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव गणेश हरीशचंद्र लाटे (वय ३६, रा. बेलुरा, ता. जि. बीड) असे असून, तो लोकांकडून पैसे घेऊन कॉम्प्युटरवर ऑनलाइन जुगार खेळत व खेळवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या कारवाईत पोलिसांनी कॉम्प्युटर साहित्य व रोख रक्कम असा एकूण ५५ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील गुटखा,मटका, दारू, सट्टा, अवैध मुरूम वाळूचे विना नंबर चालणारे हायवा,नशेचे फुलचंद पान शॉपसह इतर अवैध धंद्यावर देखील कारवाया अपॆक्षित आहेत तसेच बीड बसस्थानकातील होणारी सोने चोरी, पाकीटमारी प्रकारात मागील काही महिन्यात वाढ झाली आहे बस स्थानकातील पोलीस चौकी सुरू करून 24 तासासाठी पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी द्यावा तरच बस स्थानकातील चोऱ्या पाकीटमारी बंद होईल अशी देखील मागणी नागरिकातून होत आहे.

शीतलकुमार बल्लाळ यांनी शिवाजीनगर ठाण्याचा पदभार स्वीकारण्यापासून अवैध धंद्यावाल्यानी धसका घेतला आहे.

ही कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, उपविभागीय पोलीस अधिकारी व्यंकटराम आणि पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार संतोष राऊत, पोलीस हवालदार शिवदास घोलप, रवींद्र राघव, ज्ञानेश्वर मराडे, आनंद गिरी, सचिन आगलावे व अनिल घटमळ यांच्या पथकाने पार पाडली.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button