ब्रेकिंग न्यूज

भाजी मंडईत अतिक्रमण हटाव मोहीम.भाजीपाल्यासह साहित्य भरला टेम्पोत.

रस्त्यावर बसणाऱ्या भाजी विक्रेता,फळगाड्यावर कारवाई.

बीड ( प्रतिनिधी)बीड शहरातील मुख्य भाजी मंडई परिसरात रस्त्यावरच भाजीपाला व फळ विक्रेते बसत असल्याने नागरिकांना तसेच वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. रस्त्यावर वाढलेल्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली होती. या पार्श्वभूमीवर आज बीड नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी भाजी मंडई परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवत फळगाडे व भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई केली.

नगरपालिकेच्या पथकाने रस्त्यावर उभ्या करण्यात आलेल्या फळगाड्या व भाजी विक्रीसाठी लावण्यात आलेले तात्पुरते अतिक्रमण हटवले. या कारवाईत भाजी मंडी रस्त्यावर बसणाऱ्यांचा भाजीपाला, वजन काटे छत्री सह साहित्य टेम्पोत भरण्यात आला या कारवाईमुळे भाजी मंडई परिसरातील वाहतुकीला काही प्रमाणात दिलासा मिळाला असून नागरिकांनीही समाधान व्यक्त केले.

यापूर्वी बीड शहरातील जालना रोड, अंबिका चौक, नगर रोड, शाहूनगर तसेच बार्शी रोड परिसरातील अतिक्रमणांवर नगरपालिका व पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत अनेक अतिक्रमणे हटवली होती. त्यानंतर आता शहराच्या मुख्य भागातील भाजी मंडई परिसरात कारवाई झाल्याने रस्त्याने मोकळा श्वास घेतल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

दरम्यान, अतिक्रमण हटाव मोहीम सातत्याने सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले असून, रस्त्यावर अतिक्रमण करून फळगाडे, भाजीपाला, हॉटेल टपऱ्या अथवा अन्य व्यवसाय उभा करू नयेत, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button