बीडमध्ये पुन्हा फायरिंग;मकोकातील आरोपीला बेड्या.
गावठी पिस्टलसह दोन जिवंत काडतूस जप्त;स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई.

बीड(प्रतिनिधी )बीड शहरातील जालना रोडवरील एका बियर शॉपीमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून रविवारी (दि.11 मे) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास फायरिंगची घटना घडली. या घटनेत मकोका अंतर्गत मागील एक वर्षांपासून फरार आरोपी आशिष आठवले याने बियर शॉपी मालकावर गोळीबार केला. यात मालकाच्या पायाच्या बोटाला गोळी चाटून गेल्याने तो थोडक्यात बचावला.
घटनेची माहिती मिळताच बीड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक खटावकर व त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी आशिष आठवलेला सिनेस्टाईल पाठलाग करून ताब्यात घेतले. आरोपीला पकडताना पोलिस व आरोपीमध्ये काही काळ झटापट झाल्याचीही माहिती समोर येत आहे.
बीड शहरात पुन्हा फायरिंगची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या तत्पर कारवाईमुळे आरोपी काही तासांतच पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय बंटेवाड, शहर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ,पीएसआय खटावकर, पोहेका अशोक दुबाळे, राहुल शिंदे, सोमनाथ गायकवाड, मनोज परजणे, अशफाक सय्यद, शहेनशहा सय्यद इलिया शेख,नितीन वडमारे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.






