ब्रेकिंग न्यूज

पुलावरून चारचाकी खड्ड्यात कोसळता कोसळता वाचली !

बार्शी रोड झाला"मौत का कुवा"सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेत;जीवितहानी होण्याची शक्यता.

बीड(प्रतिनिधी)बीड शहरातील बार्शी रोडवरील धांडे नगर कमानीजवळील पुलावर आज सोमवार दि. ११ मे रोजी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मोठा अपघात टळला. वळण घेत असताना एक चारचाकी वाहन पुलालगतच्या खड्ड्यात कोसळता कोसळता बचावले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी MH 23 H 5123 क्रमांकाची चारचाकी कार बार्शी रोडवरून धांडे नगरकडे जात होती. पुलाजवळील वळण घेत असताना वाहन चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट पुलालगतच्या खड्ड्याकडे घसरली. मात्र थोडक्यात बचाव झाल्याने मोठी दुर्घटना टळली. वाहन खड्ड्यात अडकून बसल्याने काही काळ वाहतूकही प्रभावित झाली.

 धांडे नगर जवळ असलेल्या पुलाला संरक्षक कठडे अथवा लोखंडी ग्रील नसल्याने हा परिसर “मौत का कुवा” बनत चालला आहे. तसेच पुलालगत मोठे खड्डे पडले असून रात्रीच्या वेळी येथे अपघाताचा धोका अधिक वाढत आहे.

बार्शी रोडवर दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत असताना सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. “एखादा मोठा जीवितहानीचा अपघात झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार का?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button