ब्रेकिंग न्यूज

बीड मध्ये बांधकाम कामगार बोगस ? 

श्रीमंतच महागड्या चारचाकी गाड्यांतून पेटी,भांडी घेऊन गेले पहा !

बीड : महाराष्ट्र राज्य सरकारने गोरगरीब बांधकाम व मजूर कामगारांना विविध योजना राबवून हक्काचे घर मिळून दिली तसेच संसारातील गृह उपयोगी साहित्य देखील उपलब्ध करून दिले मात्र या योजनेचा लाभ गोरगरीब घेत नसून श्रीमंत अधिक घेत असल्याचे चित्र सध्या बीड जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. यामुळे बांधकाम कामगार राहत महापुरा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बीड शहरातील एमआयडीसी परिसरात दिनांक 17 मार्च रोजी बांधकाम कामगारांसाठी राबविण्यात आलेल्या योजनेतून गृहउपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. मात्र या वितरणावेळी मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहाराचा बोगस बांधकाम कामगार असल्याचा संशय व्यक्त होत आहे कारण बहुतांश कामगार हे चार चाकी स्कॉर्पिओ स्विफ्ट इतर महागड्या गाड्यातून येत साहित्य घेऊन जात असल्याचे दिसत होते.

सकाळी आठ वाजल्यापासून मोंढा भागातील एका गोडाऊनसमोर कामगारांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. सायंकाळी सात वाजेपर्यंत ही गर्दी कायम होती. विशेष म्हणजे, या ठिकाणी आलेल्या अनेक जणांनी स्कॉर्पिओ, स्विफ्टसारख्या महागड्या चारचाकी वाहनांमधून येत साहित्य घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत असून हे श्रीमंत कामगार आहेत का?असा प्रश्न सर्वसामान्य पडला 

यावरून प्रत्यक्ष गरजू आणि खरे बांधकाम कामगार यांना मिळणाऱ्या सुविधांवर बोगस नोंदणीधारकांनी डल्ला मारल्याचा संशय निर्माण झाला आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्ती या योजनेचा लाभ घेत असल्याचे चित्र दिसून आले, तर गरजू कामगार मात्र या सुविधांपासून वंचित राहत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही शासकीय वर्गातील कुटुंबीय देखील निदर्शनास आल्याने या योजनात बोगसगिरी तर झाली नाही ना असा देखील संशय निर्माण होत आहे. यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी करून पात्र लाभार्थ्यांनाच योजना मिळावी, बोगस व श्रीमंत लाभार्थ्यांना याचा लाभ देऊ नये तसेच या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरत आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button