ब्रेकिंग न्यूज

मोमीनपुरा भागात पुन्हा कत्तलखान्यावर धाड.  

तीन जनावरे व गोमांस जप्त;एक ताब्यात.पेठ बीड पोलिसांची कारवाई.

बीड( प्रतिनिधी)बीड शहरातील मोमीनपुरा, मिलत नगर परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर गोवंश कत्तलखान्यावर दिनांक 26 जुलै रविवार रोजी दुपारी तीन वाजता पेठ बीड पोलिसांनी धडक कारवाई करत गोवंश जातीची तीन जनावरे व गोवंशाचे मांस असा अंदाजे ₹62,500 किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी नदीम गफार कुरेशी (वय 38, रा. मिलत नगर, पेठ बीड) याच्याविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

    विशेष म्हणजे, मागील दोन महिन्यांतही याच मोमीनपुरा परिसरातील कत्तलखान्यांवर पेठ बीड पोलिसांनी तीन वेळा धाड टाकून कत्तलीसाठी डांबून ठेवलेली जनावरे आणि गोमांस जप्त करुन कत्तल करणाऱ्या वर पेठ पोलीस ठाण्यात गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते.मात्र, सलग कारवाया होऊनही त्याच भागात पुन्हा गोवंश कत्तलीसाठी जनावरे ठेवल्याचे या कारवाईतून समोर आले आहे.

गोवंश कत्तलबंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी:

महाराष्ट्रात लागू असलेल्या गोवंश कत्तलबंदी कायद्याअंतर्गत गोवंशाची बेकायदेशीर कत्तल, वाहतूक आणि मांसाची विक्री हा गंभीर गुन्हा मानला जातो. अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाईची तरतूद असून, कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस प्रशासन सातत्याने विशेष मोहिमा राबवत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक निलेश केळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत एपीआय शशिकांत मुसळे, पोलीस उपनिरीक्षक साईनाथ बारगळ, पोलीस हवालदार नितेश माने, चांदणे, पोलीस अंमलदार शहाजी बहीर, कल्याण जाधव आणि राठोड यांनी सहभाग घेतला.

पेठ बीड पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे बेकायदेशीर गोवंश कत्तल करणाऱ्यांविरोधात कठोर संदेश गेला असून, अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button