ब्रेकिंग न्यूज

मोठी कारवाई ! जैन पत्रा उद्योगावर टाटा स्टीलच्या अधिकाऱ्यांची धाड.

पत्र्यावर TATA नावाचा गैरवापर महागात;गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू.

बीड(प्रतिनिधी)बीड शहरातील जालना रोडवरील जैन पत्रा उद्योगावर शुक्रवारी (३ जुलै) रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास टाटा स्टील कंपनीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकल्याची माहिती समोर आली आहे. टाटा कंपनीच्या नावाचा कथित गैरवापर करून साध्या पत्र्यावर ‘TATA’ नाव पंच करून त्याची मोठया प्रमाणात विक्री केल्याने ही कारवाई करण्यात आली असून,मोठ्या प्रमाणात पत्रा, साठा जप्त करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही महिन्यांपासून बीड मधील जैन पत्रा मध्ये टाटा कंपनीच्या नावाने बनावट पद्धतीने पत्र्याची विक्री होत असल्याची माहिती कंपनीला मिळाली होती. त्यानंतर कंपनीचे अधिकारी चार दिवसांपासून बीडमध्ये येऊन गुप्त पडताळणी करत होते. चौकशीत साध्या पत्र्यावर विनापरवानगी TATA असे नाव पंच करुन विक्री होत असल्याचे प्राथमिक स्तरावर निदर्शनास आल्याने मुंबईहून आलेल्या विशेष पथकाने जैन पत्रा उद्योगावर धाड टाकली.

कारवाई दरम्यान उद्योगातील पत्रा व इतर साहित्याची तपासणी करण्यात येत असून, संशयित साहित्य जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणूक, ट्रेडमार्कचा कथित गैरवापर व संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मात्र जप्त केलेला साठा हा करोडो रुपयाचा असल्याचे देखील चर्चा आहे.

दरम्यान, उद्योगाचे संचालक यांच्या विरोधातही चौकशी सुरू असल्याची चर्चा आहे. घटनास्थळी ग्रामीण पोलिसांसह टाटा स्टीलचे अधिकारी उपस्थित असून, किती प्रमाणात बनावट ब्रँडिंग केलेला पत्रा आढळला, याचा तपास करण्यासाठी बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी ठाण मांडून आहेत, साहित्याचा पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.आज दिनांक 4 जुलै रोजी पहाटे पर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम झाले असून रोशन विजयराज बंब याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला.

या धाडीत किती रुपयांचा पत्रासाठा, साहित्य जप्त केला याची अधिकृत व सविस्तर माहिती काही वेळात देण्यात येईल.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button