ब्रेकिंग न्यूज

गुंगीचे औषध देऊन दोघांचा तरुणीवर अत्याचार.

आक्षेपार्य फोटो-व्हिडिओ व्हायरल धमकी देत तीन लाखोंसह नऊ तोळे सोन उकळले,दोघे ताब्यात.

बीड (प्रतिनिधी): बीड जिल्ह्यात तरुणी,महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चिंताजनक चित्र समोर येत असताना अंबाजोगाई येथे एका महाविद्यालयीन तरुणीवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात आरोपींनी पीडितेला बदनामीची धमकी देत तब्बल तीन लाख रुपये रोख आणि साडेनऊ तोळे सोन्याचे दागिने उकळल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबाजोगाई येथे शिक्षणासाठी राहणाऱ्या २० वर्षीय तरुणीची ओळख महेश करपे (रा. धारूर) व पवन कराड (रा. पांगरी, ता. परळी) या दोघांशी झाली होती. सुरुवातीला ओळखीचा फायदा घेत आरोपी तिचा पाठलाग करत असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, महेश करपे याने एका प्रसंगी तरुणीला खाद्यपदार्थातून(मन्चुरिन) मधून गुंगीचे औषध देऊन ती बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर दुसऱ्या आरोपीनेही तरुणीला पुण्यातील एका लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

यावेळी आरोपींनी संबंधित घटनेचे फोटो व व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच कुटुंबीयांना दाखवण्याची धमकी दिली. या भीतीचा फायदा घेत आरोपींनी पीडितेकडून वेळोवेळी रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने घेतल्याचे समोर आले आहे.

दिर्घकाळ मानसिक त्रास सहन केल्यानंतर पीडित तरुणीने अखेर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button