ब्रेकिंग न्यूज

लाचखोर अंमलदार जाळ्यात;नेकनूरमध्ये फटाके फोडून जल्लोष!

MPSC क्सला करणाऱ्याचे"कॅरेक्टर"खराब करतो म्हणणाऱ्याचे झाले कॅरेक्टर खराब.

बीड | नेकनूर पोलीस स्टेशनमधील पोलीस अंमलदार दत्ता बळवंत याला १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ताब्यात घेतल्यानंतर नागरिकांनी आणि काही नातेवाईकांनी फटाके फोडून जल्लोष केला. या कारवाईमुळे परिसरात मोठी चर्चा रंगली आहे.

  • मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या येळंब घाट परिसरातील एका तरुणाच्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर विमा दाव्यासाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर प्रक्रियेस मदत करण्याच्या बदल्यात अंमलदार दत्ता बळवंत याने १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने याबाबत ACBकडे तक्रार दिल्यानंतर पडताळणी करण्यात आली. त्यानंतर आज दुपारी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना ACBच्या पथकाने त्याला रंगेहात ताब्यात घेतले.

दरम्यान, दत्ता बळवंत याच्यावर यापूर्वीही एका शेतकऱ्याच्या मुलाला “तुझे कॅरेक्टर खराब करीन बेट्या” अशी धमकी दिल्याचा आरोप झाला होता. त्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याच तरुणाच्या नातेवाईकांनी नेकनूर शहरात फटाके फोडून या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले.

“अशा प्रकारे नागरिकांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी. दत्ता बळवंत याला तातडीने निलंबित करून बडतर्फीची प्रक्रिया सुरू करावी,” अशी मागणी नातेवाईकांनी यावेळी केली.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button