ब्रेकिंग न्यूज

पैशाच्या वादातून मित्राचा दगडाने ठेचून खून.

48 तासांत खुनाचा उलगडा व आरोपी जेरबंद;स्थानीक गुन्हे शाखेची तत्पर कारवाई.

 परळी येथील तोहिद खान यांच्या मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले असून सुरुवातीला आत्महत्येचा संशय असलेला हा प्रकार प्रत्यक्षात खून असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पैशाच्या कारणावरून मित्रांनीच तोहिद खान यांची दगडाने ठेचून हत्या केल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणाचा तपास करत स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी अवघ्या 48 तासांत तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपी ऋषिकेश परमेश्वर फड व गौरव दीपक व्यास या दोघांना ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत पैशाच्या व्यवहारातून वाद झाल्याने दोघांनी हा खून केल्याची कबुली दिली असल्याचे समजते.

 सुरुवातीला या हत्याच्या घटनेला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, काही फोन रेकॉर्डिंग देखील व्हायरल झाल्या होत्या यामुळे वातावरण चिघळण्याची चिन्ह निर्माण झाली होती परंतु बीड स्थानिक गुन्हे शाखा शिवाजी बंटेवाड यांनी गुप्त माहिती आधारित तपासाची चक्रे गतिमान करत कुणाचे खरे कारण व मारेकरी अवघ्या 48 तासात ताब्यात घेतले.

माहितीनुसार, आरोपी आणि मयत तोहिद खान हे तिघे दुपारपासून एका हॉटेलमध्ये दारू पित होते. संध्याकाळच्या सुमारास पैशाच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. याच वादातून आरोपींनी तोहिद खान यांना दगडाने ठेचून गंभीर मारहाण करत ठार मारल्याचे उघड झाले आहे.

खुनानंतर हा प्रकार आत्महत्या असल्याचा बनाव करण्यासाठी आरोपींनी मयताचा मृतदेह रेल्वे रुळाजवळ फेकल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, परिसरातील मोकाट कुत्र्यांनी मृतदेह रुळांपासून बाजूला ओढल्याने आरोपींचा बनाव फसला आणि संशय अधिक गडद झाला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलून खुनाच्या अनुषंगाने चौकशी सुरू केली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड व त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स आणि तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या 48 तासांत प्रकरणाचा छडा लावत आरोपींना ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, प्रभारी पोलीस अधिकारी चेतना सिडके मॅडम, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह.विष्णू सानप,पो.ह.आनंद मस्के,पो.ह.भताने,चालक पो.ह. नितीन वडमारे सर्व नेमणूक आणि गुन्हे शाखा बीड यांनी केली.

या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button