ब्रेकिंग न्यूज

डिझेल चोरट्यांचा पाठलाग करत पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

नेकनूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई,लाखोच्या मुद्देमाल जप्त,पाच ताब्यात.

बीड प्रतिनिधी : राज्यात इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर डिझेलचा काळाबाजार व चोरीच्या घटना वाढत असताना चौसाळा पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत डिझेल चोरी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीचा पहाटे थरारक पाठलाग करून ताब्यात घेतले. या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 इराण-इराक व अमेरिका यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असल्याने राज्यात इंधन तुटवड्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर काहीजण इंधनाचा साठा करत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, पाच जणांच्या टोळीने डिझेल चोरीचा मार्ग अवलंबल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

गुप्त माहितीच्या आधारे दिनांक 2 जून मंगळवार रोजी पहाटे चौसाळा बायपास परिसरात पहाटेच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचला. ही कारवाई पोलीस निरीक्षक साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल रामनाथ पुंडे व पोलीस शिपाई विलास घुले यांनी संशयित वाहनाचा पाठलाग केला. काही अंतरापर्यंत थरारक पाठलाग केल्यानंतर पोलिसांनी पाचही आरोपींना ताब्यात घेण्यात यश मिळवले.

या कारवाईत चोरीसाठी वापरण्यात येणारे साहित्य तसेच लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पुढील तपास चौसाळा पोलीस करत आहेत.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button