मोबाईलवर ‘चक्री’ जुगार खेळवणाऱ्या चौघांवर पेठ बीड पोलिसांची धडक कारवाई.
मोबाईल,एलईडी टीव्ही,बुलेटसह 1.20 लाखांचा मुद्देमाल जप्त; इमामपूर रोडवरील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू होता खुलेआम अवैध जुगार.

बीड (प्रतिनिधी)बीड शहरातील इमामपूर रोड परिसरात मोबाईल व एलईडी टीव्हीच्या माध्यमातून ‘चक्री’ नावाचा बेकायदेशीर जुगार खेळवणाऱ्या चौघांविरोधात पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी 1 लाख 20 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत पेठ पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार विलास यादवराव ठोंबरे (वय 40) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दि. 26 मे रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास इमामपूर रोडवरील पत्र्याच्या शेडमध्ये आरोपी विनापरवाना ‘चक्री’ नावाचा जुगार मोबाईल आणि एलईडी टीव्हीच्या साहाय्याने लोकांकडून पैसे घेऊन स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी खेळत व खेळवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
याप्रकरणी शेख आरेफ शेख वजीर (49, रा. मोमिनपुरा खाजानगर), पठाण मोबिन हाशम (29, रा. तेलगाव, ह.मु. गांधीनगर), सय्यद तौसीफ सय्यद किस्मत (37, रा. रहेमत नगर, ह.मु. गांधीनगर) आणि अख्तर अलाउद्दीन शेख (43, रा. मोमिनपुरा, बीड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान आरोपींकडून विविध कंपन्यांचे मोबाईल, एक बुलेट मोटारसायकल, एलईडी टीव्ही, माऊस, कीबोर्ड असा एकूण 1 लाख 20 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी गु.र.नं. 164/2026 अन्वये कलम 12 (अ) मु.जु.का. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार पोलीस हवालदार राऊत यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
ही कारवाई नवनीत कॉवत, प्रभारी पोलीस अधिकारी चेतना तिरके मॅडम, पोलीस उपाधीक्षक व्यंकटरमण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मारुती खेडकर, psi शहा यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकातील पोलीस कर्मचारी सुभाष मोटे, विलास ठोंबरे, नितीन राठोड, अल्ताफ शेख, विष्णू गुजर, औदुंबर गिरी, पांडुरंग पर्जने व शहाजी बहिर यांनी केली.






