ब्रेकिंग न्यूज

कत्तलसाठी आणलेल्या ४७ गोवंशांची सुटका.

सात लाखांच्या गोवंश सुटका;पेठ बीड पोलिसांची पहाटे दमदार कारवाई.

बीड(प्रतिनिधी)बीड शहरातील मोमीनपुरा परिसर पुन्हा एकदा गोवंश तस्करीच्या प्रकरणामुळे चर्चेत आला आहे.

मोमीनपुरा मध्ये मोठया प्रमाणात कत्तलसाठी गोवंश आणल्या असल्याची गुप्त माहिती पेठ बीड पोलिसांना मिळाली असता आज दिनांक १२ मे रोजी पहाटे १ ते सकाळी ६ वाजेदरम्यान पेठ बीड पोलिसांनी मोमीनपुरातील कुरेशी मोहल्ला येथे पोलीस बंदोबस्त मध्ये जाऊन तपासणी केली असता तब्बल ४७ गोवंश आढळून आल्या या गोवंश बाबद माहिती घेतली असता ही गोवंश कत्तलसाठी आल्याचे स्पष्ट झाल्याने त्या गोवंश ताब्यात घेऊन सुटका करण्यात आली.या गोवंशाची अंदाजे किंमत सुमारे ७ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

विशेष म्हणजे, मोमीनपुरा भागात यापूर्वीही अनेक वेळा गोवंश तस्करी व कत्तलीसाठी साठा केल्याप्रकरणी कारवाया झाल्या आहेत. तरीदेखील पुन्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात गोवंश आढळल्याने “मोमीनपुरा गोवंश तस्करीचे हॉटस्पॉट बनत आहे का?” असा प्रश्न आता नागरिकांतून उपस्थित होत आहे.

महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी कायदा लागू असताना काही तस्करांकडून अजूनही गुप्तपणे गोवंश वाहतूक व कत्तलीचे प्रकार सुरू असल्याचे या कारवाईतून समोर आले आहे. गोवंश तस्करीमुळे केवळ कायद्याचे उल्लंघन होत नाही, तर सामाजिक वातावरणही दूषित होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.गोवंश तस्करी करणारावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकातून होत आहे. यापूर्वी देखील गौरक्षक दलाने तसेच विविध पशुप्रेमी संघटनांनी गोवंश कत्तल विरोधात आवाज उठवला होता.  

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर व पोलीस उपअधीक्षक व्यंकटरमण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वैभव पाटील, एपीआय उबाळे, एपीआय पुजारी, पीएसआय बारगळ, पोलीस हवालदार मोठे, राठोड, सिकेतोड, गुजर,ओव्हाळ, राख, भोजे तसेच आरसीपी पथकातील पोलीस हवालदार गायकवाड व इतर अंमलदारांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

दरम्यान, पेठ बीड पोलिसांनी केलेल्या या दमदार कारवाईमुळे गोवंश तस्करांचे धाबे दणाणले असून शहरात एकच खळबळ उडाली आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button